सोमनाथ घार्गे, पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर यांनी पोनि/श्री. किरणकुमार कबाडी, स्थागुशा अहिल्यानगर यांना जिल्ह्यातील अवैध वाळु वाहतुकी विरुध्द कारवाई करणेबाबत आदेशित केले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. किरणकुमार कबाडी यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस अंमलदार पोना/भिमराज खर्से, राहुल डोके, पोकॉ/ प्रमोद जाधव, बाळासाहेब खेडकर, मनोज साखरे अशांचे पथक तयार करुन अवैध वाळु उपसा व वाहतुकी विरुध्द कारवाई करणेकामी रवाना केले.
दिनांक 14/09/2025 रोजी पथक कोपरगांव तालुका पोलीस ठाणे हद्दीत अवैध वाळु उत्खनन/उपसा बाबत माहिती काढत असताना पथकास गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, इसम नामे 1) अमोल विघे 2) कृष्णा सोनवणे हे त्याचे ताब्यात टेम्पोच्या साहाय्याने अवैध वाळुची माहेगांव शिवारातुन गोदावरी नदी पात्रातुन वाहतुक करणार आहेत. पथकातील पोलीस अंमलदारांनी तात्काळ माहेगांव देशमुख शिवारात जाऊन सापळा रचुन बातमीतील एक विटकरी रंगाचा टाटा टर्बो 709 टेम्पो व पिवळे मुडके व निळा हौदा असलेला टाटा 912 टेम्पो मिळून आल्याने, दोन्ही टेम्पो थांबवून चालकास ताब्यात घेवुन, पोलीस पथकाची ओळख सांगुन त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव 1) अमोल दिलीप विघे वय-27 वर्षे रा. गोरोबानगर, कोपरगांव ता.कोपरगांव जि. अहिल्यानगर व 2) कृष्णा संजय सोनवणे वय-26 वर्षे रा. इंडस्ट्रीयल येरिया मनाई, ता.पारनेर, जि.अहिल्यानगर असे असल्याचे सांगीतले. तसेच दोघांकडे त्यांचेकडील वाहनांचे मालकाबाबत चौकशी केली असता 1) अमोल विघे यांनी स्वतः मालक चालक असल्याचे सांगितले, 2) कृष्णा सोनवणे यांनी वाहन मालकाचे नांव 3) सचिन जाधव रा. इंदिरानगर कोपरगांव ता.कोपरगांव जि. अहिल्यानगर (फरार) असे सांगितले. ताब्यात घेण्यात आलेल्या इसम यांचेकडे वाळु वाहतुकीचा कोणताही शासकीय परवाना नसल्याने पंचासमक्ष रु. 22,00,000/- किंमतीचे दोन टेम्पो 1) एक विटकरी रंगाचा टाटा टर्बो 709 टेम्पो क्रमांक एम.एच.04. डी. 8348 वाहन वाळु भरीत असलेला, 2) पिवळे मुडके व निळा हौदा असलेला टाटा 912 टेम्पो क्रमांक एम.एच.17.सी.व्ही.3686 वाहनामध्ये 9,000/- रु कि.ची 2 ब्रास वाळु असा एकुण रु. 22,09,000/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
वरील तीन्ही आरोपीविरूध्द कोपरगांव तालुका पोलीस स्टेशन गुरनं 265/2025 बीएनएस 2023 चे कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, वरील प्रमाणे आरोपी 1) व 2) आणि रु. 22,09,000/- कि.चा गुन्ह्यातील मुद्देमाल कोपरगांव तालुका पोलीस स्टेशन यांचे ताब्यात देण्यात आली आहे. गुन्हयाचा पुढील तपास कोपरगांव तालुका, पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
सदरची कारवाई श्री. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
DN SPORTS