Letest News
स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची मोठी कारवाई 120 किलो 905 ग्रॅम वजनाचे गांजासह एकुण 80,83,464/- रुपय... पत्रकारीता क्षेत्रात शौकतभाई शेख म्हणजे एक प्रेरणादायी व्यक्तीमत्व ज्येष्ठ पत्रकार शौकतभाई शेख यांच्... मागील भांडणाच्या कारणावरून एका कुविख्यात गुंड्याने केले गोळीबार श्रीरामपूर शहर हादरले  थायलंड येथे झालेल्या शरीर सौष्ठव स्पर्धा मध्ये शिर्डी चा निलेश वाडेकर याने मिळवले ब्रांझ मेडल कोट्यावधिचे मुद्देमाल जप्त करत नगर गुन्हे अन्वेषण पथकाने केली कामगीरी भारी !! शरद पवारास जिल्हाधिकारी साहेबांचा चांगलाच हिसका ! शेतकऱ्याचा चोरीस गेलेला जेसीबी मोठया शिताफिने हस्तगत स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई कोयता व सुऱ्याचा धाक दाखवुन लुटमार करणाऱ्या दोन टोळयांमधील 4 आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद शिर्डी वाहतूक शाखेकडून नाकाबंदी करून कारवाई पोलीस निरीक्षक महेश येसेकर देह व्यापार रोखण्यासाठी पोलिसांनी केले चार हॉटेल सील हॉटेल् सील झाल्यामुळे परिसरात मोठी खळबळ
अ.नगरराजकीय

शिवसेनेची बुलंदतोफ भानुदास मरकुटेंची घर वापसी संजय छल्लारे सह शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदेसेनेत प्रवेश

                                   शिर्डी (प्रतिनिधी)-

श्रीरामपूर येथील माजी आमदार भानुदास मुरकुटे व माजी नगरसेवक संजय छल्लारे, निरज मुरकुटे, गणेश छल्लारे, प्रवीण फरगडे, सिद्धांत छल्लारे, लक्ष्मण कुमावत,भगवान उपाध्ये, शेखर दुब्बैया, तेजस बोरावके, रोहित नाईक, संजय साळवे, संजय परदेशी, महेंद्र टाटिया यांच्यासह इतर अनेक कार्यकर्त्यांनी मुंबईत शनिवार दि. ७ जुन २०२५ रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

याप्रसंगी शिवसेनेचे राज्य सचिव राम रेपाळे, सचिव संजय मोरे, प्रवक्ते राहुल लोंढे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, यांच्यासह तालुक्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या पक्षप्रवेशामुळे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद अधिक बळावणार आहे, त्यामुळे श्रीरामपूर चे अनेक गणिते बिघडणार असल्याचे दिसून येत आहे.हा पक्ष प्रवेश प्रामुख्याने विकासाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून करण्यात आला

असल्याचे सांगण्यात आले आहे. ग्रामीण व शहरी भागातील अनेक माजी पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, सरपंच, उपसरपंच, व्यापारी व सामाजिक कार्यकर्त्याचा या सोहळ्यात लक्षणीय सहभाग होता. त्यामुळे येत्या काळात स्थानिक राजकारणात मोठे बदल घडण्याची चिन्हे देखील दिसून येत आहेत.

याप्रसंगी उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललो आहोत, मुख्यमंत्री असताना राज्यातील सर्वसामान्यांसाठी अनेक लोककल्याणकारी योजना आम्ही आणल्या.सध्या महायुतीची दुसरे पर्व सुरू आहे.

देवेंद्र फडणवीस आणि माझ्या नेतृत्वाखाली सरकारने महाराष्ट्राला विकासाच्या दिशेने नेताना ‘सर्वसामान्य माणूस’ केंद्रस्थानी ठेवला आहे. महाराष्ट्राची प्रगती, औद्योगिक वाढ आणि सामाजिक समरसता हेच आमचे ध्येय आहे.
एखाद्याला शब्द दिला तर तो पूर्ण करतो हे मुख्यमंत्री असताना मागील अडीच वर्षांत महाराष्ट्रातील जनतेने पाहिले आणि अनुभवले आहे.

महायुतीच्या नेतृत्वाखाली सरकार हे स्थगिती नव्हे तर प्रगती व समृद्धीचे सरकार असल्याचा पुनरुच्चार ना. शिंदे यांनी यावेळी केला.
मुरकुटे यांच्या प्रवेशाने या सोहळ्यात विशेष लक्ष वेधून घेतले,निरज मुरकुटे (माजी आ.भानुदास मुरकुटे यांचे नातू यांनी ऑस्ट्रेलियातील सिडनी विद्यापीठातून उच्च शिक्षण घेतल्यानंतर थेट शिवसेनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली.

याबद्दल शिंदे म्हणाले, “समाजहितासाठी उच्चशिक्षित पिढीने राजकारणात सक्रीय भाग घेणे ही काळाची गरज आहे. निरज मुरकुटे यांच्यासारखे तरुण हे पक्षाला बळकटी देणारे आहेत असेही ना. शिंदे म्हणाले.याच कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनेचे युवा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या अलीकडील परदेश दौऱ्याचा विशेष उल्लेख केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.श्रीकांत शिंदे यांनी चार देशांच्या दौऱ्यात ऑपरेशन सिंदूर’ संदर्भात भारताची भूमिका प्रभावीपणे मांडली आणि पाकिस्तानचा खरा चेहरा उघड केला. त्या चारही देशांनी भारताला पाठिंबा देत पाकिस्तानला विरोध दर्शवला असेही त्यांनी स्पष्ट केले.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button