Letest News
शिर्डीतील ‘चिन्नाराव’ हॉटेलच्या जेवणात झुरळ? फोटो समोर येताच खळबळ! “विखे पाटलांना काहीच कळत नाही त्यांना फक्त साखर कारखानाच कळतो!” – मनोज जरांगे पाटील तालुक्याला दोन आमदार पण एकही नाही दमदार!रस्त्यांच्या खड्ड्यांनी हैराण कोपरगावकरांचा संताप फलकावर पुण्यातील साईभक्त रामदास तापकीर यांनी अर्पण केला १३ लाख ४२ हजार ९८० रुपये किंमतीचा ९० ग्रॅम सोन्याचा... शिर्डीचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक अमोल विठ्ठलराव गंगलवाड चे टोकाचे पाऊल रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्... उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतले श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन अहिल्यानगर पोलिस दलात खळबळ! अमली पदार्थ विक्रीकांडात LCBचे माजी प्रमुख कबाडींना मॅटचा दणका नितीन गडकरी ॲक्शन मोडमध्ये- नगर–मनमाड महामार्गाच्या चौकशीसाठी केंद्रीय समिती‘ट्रंप तात्या डांबर देत ... राहता पोलिसांची दमदार कारवाई काल महिलेला लुटले आज चारही आरोपी ताब्यात! श्री साईबाबांच्या चरणी ११ लाख १९ हजार रुपयांचे हिरेजडित सोन्याचे ब्रोच अर्पण
अ.नगरशिर्डी

हाजी अब्दुल बाबा समाधी मंदिर व त्यांच्या झोपडीतील भाविकांनी दिलेले देणगी संस्थांनने जमा करावी -आ. संग्राम जगताप

शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डी येथील संस्थान परिसरात असणाऱ्या साईबाबांच्या समकालीन भक्तांच्या समाधी मंदिराप्रमाणेच हाजी अब्दुल बाबा यांच्या समाधी मंदिरात भाविकांनी दिलेला देणगी रुपये निधी साई संस्थान ट्रस्टला जमा व्हावा. यासाठी सरकारने लक्ष द्यावे. अशी मागणी आपण शासनाकडे करणार आहोत. अशी माहिती अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी केली आहे. ते शनिवारी शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिवेशनासाठी आले होते.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


यावेळी शिर्डीमध्ये माध्यमांशी बोलताना आमदार संग्राम जगताप म्हणाले की,शिर्डी येथील साई मंदिर व साई मंदिर परिसरात समकालीन साईभक्त तात्या पाटील कोते, भाऊजी महाराज कुंभार, अय्यर महाराज, व हाजी अब्दुल बाबा या साईबाबांच्या समकालीन‌ चार भक्तांच्या समाधी आहेत. या चार समाधी मंदिरांपैकी भक्त हाजी अब्दुल बाबा यांच्या समाधी मंदिरात साई भक्तांनी दिलेली देणगीरुपी रक्कम दान हे ट्रस्ट कडे जमा न होता तेथील खाजगी व्यवस्था पाहणारे हे स्वतः घेऊन जातात. खाजगी कारणाकरता वापरतात. हे नियमाचे विरोधात आहे.


शिर्डी मध्ये श्री साईबाबांच्या दर्शनाला भारतातून अनेक भाविक येतात. दक्षिणा टाकतात. शिर्डी येथे श्री साई संस्थान हे सरकारच्या अधिपत्याखाली आलेले ट्रस्ट आहे. साई मंदिर व साई मंदिरातील साई समकालीन भक्त तात्या पाटील कोते ,भाऊजी कुंभार व अय्यर महाराज यांच्या समाधी मंदिरातील सर्व देणगीरुपी निधी हा ट्रस्टला जमा होतो.

मात्र फक्त हाजी अब्दुल बाबा यांच्या समाधी मंदिरातील व त्यांच्या झोपडीतील पैसा हा ट्रस्टला जमा न होता तो हाजी अब्दुल बाबाचे वारस समजणारे स्वतः घेऊन जातात. या निधीचा खाजगी वापर करतात. ते ट्रस्टच्या किंवा संविधानाच्या विरोधात आहे. भाविकांनी हाजी अब्दुल बाबा समाधी मंदिरात दिलेला देणगीरुपी निधी हा ट्रस्टने जमा करावा. या समाधी मंदिरात दररोज हजारो व गर्दी काळात लाखो रुपये देणगी स्वरूपात निधी जमा होत असतो.

तो साई संस्थानने स्वतः जमा करावा .अशी मागणी आपण शासनाकडे करणार आहोत. काही वर्षांपूर्वी शिर्डीतील गावकऱ्यांनीही आमचे पूर्वज यांच्या समाध्या येथे आहेत. आम्हीही या समाधी मंदिरातील भाविकांनी दिलेले दान, निधी त्यांचे वारस म्हणून आम्ही घेऊ शकतो. अशी मागणी केली होती .

मात्र शिर्डीत शांतता रहावी म्हणून हा विषय त्यावेळी तात्पुरता बंद झाला होता. मात्र संस्थान परिसरातील तीन समाधी मंदिरातील देणगी साई संस्थान जमा करते. मात्र एकमेव हाजी अब्दुल बाबा समाधी मंदिरातील देणगी ट्रस्ट का जमा करत नाही? तेथील निधी ही संस्थांनने जमा करावा. अशी मागणी आपण लवकरच शासनाकडे करणार असल्याचे आमदार संग्राम जगताप यांनी म्हटले आहे.


गेल्या वर्षी शिर्डी मध्ये संस्थान परिसरातील साईबाबांचे समकालीन भक्त तात्या पाटील कोते ,भाऊजी कुंभार महाराज, अय्यर महाराज यांच्या समाधी मंदिरातील देणगी संस्थान जमा करते त्याचप्रमाणे भक्त हाजी अब्दुल बाबा यांच्याही समाधी मंदिरातील व साई चावडी मंदिरासमोरील हाजी अब्दुल बाबा झोपडीतील भाविकांनी दिलेला दानरूपी निधी साई संस्थांनने जमा करावा.

तेथे साई संस्थेनने दक्षिणा पेट्या ठेवाव्यात अशी मागणी भारतीय लहुजी सेनेचे समीर (अण्णा) वीर यांनी केली होती. मात्र त्याकडेही संस्थांनने दुर्लक्ष केले होते. यापुढे साई संस्थांनने या मागणीकडे लक्ष द्यावे व शासनाने ही विशेषता विधी व न्याय विभागाने, धर्मदाय आयुक्त यांनी याकडे लक्ष देऊन शिर्डीत असणाऱ्या साई भक्त हाजी अब्दुल बाबा समाधी मंदिर व हाजी अब्दुल बाबा झोपडीतील भाविकांनी दिलेला देणगीरुपी निधी कोणालाही खाजगी न घेऊ देता साई संस्थानने स्वतः जमा करावा

.तेथे दक्षिणपेटी ठेवावी. साई संस्थांनचे पुजारी तेथे ठेवावेत. अशी मागणी शिर्डीसह साई भक्तांमधून आता जोर धरू लागली आहे. अन्यथा या विरोधात आवाज उठवला जाईल असा इशाराही भारतीय लहुजी सेनेचे समीर (अण्णा) वीर यांनी एका पत्रकाद्वारे दिला आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button