Letest News
निमगाव को-हाळे बायपासवर भीषण अपघात — कातोरे वस्ती हादरली! काका कोयटे हजर हो! SID ची नोटीस-समता पतसंस्थेत १००+ बोगस खाती? सावकारीच्या जाळ्यात अडकलेले शिर्डी? खरात अटकेत-मोठ्या नावांची धास्ती!” “पोलीसांचा मोठा फटका! अशोक खर... शिर्डीची लेक ठरली उज्ज्वल यशाची प्रेरणा — डॉ. सृष्टी सोनवणे यांचे एमबीबीएसमध्ये उच्च श्रेणीने यश शिर्डीला जोडणाऱ्या रस्त्यासाठी २१३ कोटी रुपयांची तरतूद “कायदा राखणारेच झाले लाचखोर!” — पाथर्डीत पोलीसांचा काळा चेहरा उघड “१० हजारांत पोटातील भविष्य विक्रीला!” — राहाता तालुक्यात गर्भलिंग निदानाचा काळाबाजार उघड जबरदस्ती धर्मांतराचा आरोप —आरोपी ताब्यात-विविध कलमांन्वये गुन्हा दाखल- शिर्डीत खळबळ- मुंबईच्या झोपडपट्टी दादाची शिर्डीत पेट्रोल पंपावर दादागिरी -शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल “९ नाण्यांचा वाद” पुन्हा पेटला — शिर्डीत संतापाची लाट-“भीती संपली म्हणून धंदा?” — ग्रामस्थांचा थेट स...
राजकीयशिर्डी

श्री साईबाबांच्या पादुका दर्शन सोहळ्याला विदर्भात भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ✨

नागपूर | प्रतिनिधी

sai nirman
जाहिरात

दिनांक 10 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबर 2025 या कालावधीत विदर्भातील विविध शहरांमध्ये आयोजित श्री साईबाबांच्या पादुका दर्शन सोहळ्याला भाविकांचा अभूतपूर्व आणि उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. श्रद्धा, भक्ती आणि साईप्रेम यांचा सुंदर संगम या सोहळ्यात अनुभवायला मिळाला.

DN SPORTS

kamlakar

या दर्शन सोहळ्याची सुरुवात नागपूर येथे 11 आणि 12 ऑक्टोबर रोजी चिटणवीस मैदानात झाली. त्यानंतर श्रींच्या पवित्र पादुका अनुक्रमे
चंद्रपूर (दाताळा साई मंदिर) – 13 ऑक्टोबर,
गडचिरोली साई मंदिर – 14 ऑक्टोबर,
आणि वर्धा साई मंदिर – 15 ऑक्टोबर रोजी दर्शनासाठी पोहोचल्या.

प्रत्येक ठिकाणी साई भक्तांनी मोठ्या उत्साहाने पादुकांचे स्वागत केले. बाईक रॅली, टाळ-मृदुंगाच्या गजरात भजनी मंडळे, रंगीबेरंगी रांगोळ्या आणि ढोल-ताशा पथकांद्वारे श्रींचे आगमन घडवण्यात आले. या पवित्र दर्शन सोहळ्यात लाखो साईभक्त सहभागी झाले. विशेष म्हणजे अनेक ठिकाणी वयोवृद्ध, अपंग, अंध भाविक, अनाथालयातील मुले आणि वृद्धाश्रमातील वृद्धांनीही भक्तिभावाने श्रींचे दर्शन घेतले.


✨ शेगावमध्ये ‘साई–गजानन संतभेट’ सोहळा ऐतिहासिक ठरला ✨

या संपूर्ण सोहळ्याचा परमोच्च क्षण 16 ऑक्टोबर 2025 रोजी शेगाव येथे अनुभवायला मिळाला. येथे श्री साईबाबांच्या पादुकांचा आणि श्री संत गजानन महाराजांचा संतभेट (बंधूभेट) सोहळा अत्यंत भव्य स्वरूपात पार पडला.

“ॐ साई बाबा नमो नमः” या नामघोषात आणि टाळ-मृदुंगाच्या गजरात, श्री गजानन महाराज देवस्थान समितीचे माननीय अध्यक्ष श्री नीलकंठ भाऊ पाटील, तसेच देवस्थान समितीचे व्यवस्थापकीय संचालक व वरिष्ठ अधिकारी यांनी श्रींच्या पादुकांचे भव्य स्वागत केले. श्री संत गजानन महाराजांच्या समाधीसमोर पादुका व श्री साईबाबांच्या तस्वीरचे पूजन करण्यात आले. त्यानंतर विठ्ठलाच्या मूर्तीसमोरील व्यासपीठावर पादुका दर्शनासाठी ठेवण्यात आल्या.

या वेळी श्री गजानन महाराज देवस्थान समितीचे मा. अध्यक्ष महोदयांनी श्रींच्या पादुकांचे पाद्यपूजन केले. हजारो भाविकांनी या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होत साईंच्या दर्शनाचा लाभ घेतला.

श्री गजानन महाराज देवस्थान समितीतर्फे या प्रसंगी सर्व उपस्थित भाविकांना भोजन प्रसाद देण्यात आला.


✨ समिती व अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन ✨

या संपूर्ण दौऱ्यासाठी माननीय तदर्थ समिती अध्यक्षा श्रीमती अंजू शेंडे (सोनटके), समिती सदस्य तथा जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया आणि श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

तसेच श्री साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे, प्रशासकीय अधिकारी श्री संदीपकुमार भोसले, श्री विश्वनाथ बजाज, प्रभारी अधीक्षक श्री रामदास कोकणे, श्री संजय शिंदे, श्री नवनाथ मते, श्री अतुल कुंभकर्ण आदी अधिकारी आणि कर्मचारी या संपूर्ण दौऱ्यात सक्रियपणे सहभागी होते.


🌼 श्रद्धा, भक्ती आणि साईप्रेमाचा अविस्मरणीय संगम 🌼

श्री साईबाबांच्या पादुका दर्शन सोहळ्याने विदर्भातील भाविकांच्या मनात नवचैतन्य निर्माण केले. सर्वत्र साईनामाच्या घोषात एकात्मतेचा आणि भक्तीभावाचा संदेश दिला गेला.
हा सोहळा श्रद्धा, सबुरी आणि साईंच्या प्रेमाने ओथंबलेला — भक्तांच्या मनावर अमिट छाप सोडणारा ठरला.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button