Letest News
चिन्नाराव हॉटेल प्रकरणाने शिर्डीत खळबळ आता शिर्डी नगर परिषद कारवाई करणार का? रक्षाबंधनाचा स्नेहसोहळा शिर्डीत उत्साहात- महिलांनी सुजय विखे यांच्या हातावर बांधली राखी बनावट नंबरच्या बेवारस दुचाकीचा छडा- साई संस्थानच्या सुरक्षा विभागाने शोधला मूळ मालक महाराष्ट्रात तुकाराम मुंडे… तर तेलंगणात वैभव गायकवाड! अहिल्यानगरच्या भूमिपुत्राच्या धडक कारवाईने गुन... पत्रकारितेतील चार दशकांचा प्रदीर्घ प्रवास- असंख्य पत्रकारांचे मार्गदर्शक ज्येष्ठ पत्रकार शौकतभाई शेख... “राधाकृष्ण विखेंना हटवा…” जरांगेंच्या निर्णायक आंदोलनापूर्वीच मुख्यमंत्र्यांना थेट पत्र! संघर्षाच्या वाटेवरून यशाची पहिली पायरी चढला गौरव लोकचंदानी-बार कौन्सिलची सनद मिळवत वकिलीच्या नव्या प... शिर्डीतील ‘चिन्नाराव’ हॉटेलच्या जेवणात झुरळ? फोटो समोर येताच खळबळ! “विखे पाटलांना काहीच कळत नाही त्यांना फक्त साखर कारखानाच कळतो!” – मनोज जरांगे पाटील तालुक्याला दोन आमदार पण एकही नाही दमदार!रस्त्यांच्या खड्ड्यांनी हैराण कोपरगावकरांचा संताप फलकावर
अ.नगरक्राईम

मोबाईलचा स्फोट, शिक्षकाचा जागीच मृत्यू

शर्टच्या खिशात ठेवलेल्या मोबाइलचा अचानक स्फोट होऊन शुक्रवारी सायंकाळी एका शिक्षकाचा मृत्यू झाला. तर एक व्यक्ती जखमी झाली. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील सिरेगाव-सानगडी मार्गावरील केसलवाडा फाटा परिसरात शुक्रवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. सुरेश भिकाजी संग्रामे (रा. टोला सिरेगाव) असे मृत शिक्षकाचे नाव आहे. तर नत्थू गायकवाड असे जखमी नातेवाइकाचे नाव आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

साकोली तालुक्यातील सानगडी येथे शुक्रवारी आठवडी बाजार होता. सुरेश संग्रामे आणि नत्थू गायकवाड हे दोघेही या बाजारासाठी गेले होते. बाजार करून परत गावी येत असताना सिरेगाव ते सानगडी मार्गावरील केसलवाडा फाटा परिसरात सुरेश यांच्या शर्टच्या वरच्या खिशात असलेल्या मोबाइलचा अचानक स्फोट झाला. त्यामुळे त्यांच्या छातीचा काही भाग जळाला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीवर मागे बसलेले गायकवाड हे गाडीवरून खाली पडल्याने जखमी झाले. त्यांना उपचारासाठी भंडारा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button