Letest News
शिर्डी साई मंदिर सुरक्षेसाठी नवे प्रभारी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गेंचे आदेश साईपरंपरेचा वारसा जपणारे व्यक्तिमत्व – मिलिंद (दादा) कोते पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भक्तीचा महासागर उसळणार! शिरडी परिक्रमा महोत्सवासाठी साईनगरी सज्ज साईसेवेचा सुंदर नमुना-संस्थानला २५ लाखांची अत्याधुनिक स्कूल बस भेट साईकृपेचा दुहेरी आनंद-ठाण्याच्या नार्वेकर कुटुंबीयांकडून ११ लाखांचे दोन सोन्याचे दिवे अर्पण शिर्डीसाठी स्वतंत्र उत्पादन शुल्क अधीक्षक कार्यालय-आता ‘दारूमुक्त शिर्डी’ची खरी परीक्षा! खाकीतील कर्तव्यनिष्ठ नेतृत्वाचा गौरव शिर्डी विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल भारती साहेबांचा वा... अनैतिक देहव्यापारावर पोलिसांचा कडक घावश्रीरामपुरातील ‘आदर्श लॉज’ एक वर्षासाठी बंद-लॉज सील शिर्डीत साईभक्तांची लूट थांबली नाही! विखे पिता–पुत्रांच्या सूचनांना एजंटांची हरताळ? साईनगरीत बालशोषणावर कडक घाव! भिक्षा आणि विक्रीसाठी वापरल्या जाणाऱ्या १४ अल्पवयीन बालकांची सुटका
Blog

निमगाव ग्रामपंचायत निवडणूक 2023 साठी मतदान प्रक्रिया उत्साहात सुरू..!

राहाता तालुक्यातील बारा ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. शिर्डी जवळील निमगाव येथील ग्रामपंचायत निवडणुकीसाठीही आज रविवार 5 नोव्हेंबर रोजी मतदान होत असून येथे तीन पॅनल मध्ये लढत होत आहे. मतदानाला येथील शाळेत सकाळी मोठ्या उत्साहात सुरुवात झाली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

त्यानंतर गावातील व वाड्यावर त्यांवरील सर्वच प्रभागातील मतदार मतदान केंद्राकडे येऊ लागले व मतदान केंद्राबाहेर मतदारांची रांग लागल्याचे दिसून येत होते. वयोवृद्ध आजी-आजोबाही मतदानासाठी मोठ्या उत्साहाने मतदान केंद्रावर आल्याचे दिसून आले. तिन्ही पॅनलचे बुथवर मतदारांना मतदान यादीतील क्रमांक देण्याचे काम कार्यकर्त्यांकडून होत होते. सर्वच पॅनलच्या बुथवर कार्यकर्त्यांची, मतदारांची मोठी गर्दी दिसून येत होती. मतदारांमध्येही उत्साह दिसून येत होता.पोलीस बंदोबस्त ही तैनात करण्यात आला होता. कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रा बाहेर गर्दी करू नये. यासाठी पोलीस वारंवार कार्यकर्त्यांना 100 मीटर दूर जाण्याचे सांगत होते.


शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात येथे मतदान सुरू होते. निमगाव येथे आज रविवारचा आठवडे बाजार या निवडणुकीमुळे बंद ठेवण्यात आला होता. आज रविवार असल्याने येथील प्रसिद्ध श्री खंडोबा मंदिरात सर्वच पॅनलच्या उमेदवारांनी दर्शन घेऊन विजयी होण्यासाठी श्री खंडेरायाला साकडे घातले. कार्यकर्तेही आपलाच पॅनल येथे विजयी होणार असा दावा करताना दिसून येत होते. अनेकांनी तर त्यासाठी नवस केले. पैजाही ही लावल्याचे समजते. येथील निवडणूक चुरशीची होत असून उद्या 6 नोव्हेंबर रोजी राहता येथे तहसील कार्यालयात मतमोजणी होणार असल्याने निमगाव ग्रामपंचायत निवडणुकीत कोण बाजी मारेल याकडे अवघ्या तालुक्याचे लक्ष लागून आहे

kamlakar

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button