शिर्डी | आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिर्डीकर मतदारांमध्ये एक ठाम मत आकार घेत आहे — “आता केवळ ओळख नव्हे, तर पात्रता आणि प्रामाणिकपणावर उमेदवारी द्यावी!”
गेल्या काही दिवसांत शहरातील विविध समाजघटक, व्यावसायिक व नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे की, विखे कुटुंबाने यावेळी सक्षम, सुशिक्षित आणि जनतेशी नाळ जोडलेले उमेदवारच मैदानात उतरवावेत.
🔸 “अनुभवी आणि लोकाभिमुख व्यक्तींनाच संधी”
नागरिकांचे मत आहे की, किमान पाच वर्षांचा सामाजिक किंवा सार्वजनिक अनुभव असलेल्यांनाच उमेदवारीची संधी दिली पाहिजे.
शिर्डी नगरपरिषदेसारख्या संवेदनशील व वाढत्या शहरात केवळ नावापुरते नव्हे, तर काम करणारे लोक गरजेचे आहेत, असे स्पष्टपणे सांगितले जात आहे.
🔸 “कुटुंबाचा सामाजिक सहभाग आवश्यक”
निवडणुकीच्या दृष्टीने नागरिकांचा आग्रह आहे की, ज्या घरातील उमेदवार देणार आहे, त्याचे कुटुंबही समाजात मिसळून राहणारे असावे.
लोकांमध्ये विश्वास निर्माण होण्यासाठी उमेदवार आणि त्याचे कुटुंब समाजाच्या प्रत्येक घटकात आदराने राहणारे असावे, ही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
🔸 “शिक्षण, चारित्र्य आणि गुन्हामुक्त पार्श्वभूमी गरजेची”
शिर्डीकरांनी स्पष्ट सांगितले —
“उमेदवार हा गुन्हा दाखल नसलेला, प्रवृत्तीने प्रामाणिक आणि सुशिक्षित असावा.
किमान शिक्षण असलेला व कुटुंब सुशिक्षित असलेले लोक शहराचा चेहरा बदलू शकतात.”
शिक्षण आणि चारित्र्य हे उमेदवारीचे निकष व्हावेत, अशी मागणी होत आहे.
🔸 “सर्व समाजघटकांना सोबत घेणारे नेतृत्व हवे”
शिर्डी हे विविध जाती-धर्मांच्या लोकांचे एकत्र नांदणारे शहर आहे.
म्हणून नागरिकांच्या अपेक्षा आहेत की, उमेदवार सर्व समाजघटकांना समान वागणूक देणारा, विरोधकांनाही सोबत घेऊन चालणारा आणि वार्डातील तसेच शहरातील सर्व समस्यांची जाण असणारा असावा.
🔹 शिर्डीकरांचा ठाम संदेश
“विखे कुटुंबाने या वेळेस आदर्श, लोकाभिमुख आणि प्रामाणिक उमेदवारच द्यावेत.
शिर्डीला विकासाच्या नव्या वाटेवर नेणारे, सर्वांना जोडणारे नेतृत्व आम्हाला हवे आहे.”
🗣️ जनतेचा स्पष्ट सूर —
“नेतृत्व बदललं तरी कार्यसंस्कृती बदलली पाहिजे!” 🙏
दैनिक साईदर्शनाच्या सर्वे नुसार पुढील नगराध्यक्षा हे शेजवळ कुटुंबियांतूनच होईल परंतु ते शेजवळ कोण?
आपलें काय मत आहे ते अवश्य कळवावे
