Letest News
पैशांचा मोह नाही- कर्तव्याशी इमान! साई संस्थानच्या कर्मचाऱ्याचे कौतुक पादुका दर्शन सोहळ्यामुळे शिर्डीच्या दसरा-पुण्यतिथी उत्सवाला ग्रहण?अ‍ॅड. गोकुळ ठुबे यांची चौकशीची माग... प्रारंभ राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेसाठी भरती सुरू-पदवीधर तरुणांना रोजगाराची संधी! दहीहंडी फोडून श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवाची भक्तिमय वातावरणात सांगता! रक्षाबंधनाच्या पवित्र नात्याला काळिमा नीच चैतन्य पाटीलच्या कृत्याचा काळा महिमा!! इन्स्टाग्रामवरील मैत्री ठरली मानसिक छळाचा ससेमिरा; दोघांवर गंभीर गुन्हा! शिर्डीत साईभक्त महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या चैन ओरबाडल्याची धक्कादायक घटना समोर आली शासकीय विश्रामगृहात व्हिआयपी!व्हिव्हिआयपी तथा मंत्रीगण येतात!! थंड पेय तथा चहा! कॉफी पंचपक्वाने सोबत... राहात्यात सोशल मीडियावर बदनामीचा धडाका सहा जण पोलिसांच्या रडारवर! मंत्र्याचा मुलगा राजकुमार शिर्डी परिसरात पोलीस वाहनांच्या ताफ्यात फिरण्यावरून राजेंद्र पिपाडांचा घणा...
क्राईमशिर्डी

शिर्डीत साई दर्शनाहून परतणाऱ्या महिलेवर जबरी चोरीदोन चोरट्यांनी सोन्याचे दागिने ओढून पलायन

शिर्डी | प्रतिनिधी
शिर्डीमध्ये भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, श्रीसाईबाबा मंदिरातून दर्शन घेऊन परतणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने ओढून पळ काढल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे शिर्डी शहरात एकच खळबळ उडाली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


दि. १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी साडेसात ते साडेनऊच्या दरम्यान, साईश कार्नरजवळील हॉटेल अलौकिक पॅलेससमोर ही घटना घडली. फिर्यादी हे आपल्या आई-वडील, पत्नी व बहिणीसह साईबाबा मंदिरात दर्शनासाठी आले होते. दर्शन आटोपून परत येत असताना, दोन अज्ञात इसम मोटारसायकलवर समोरून आले आणि क्षणाचाही विलंब न करता फिर्यादीच्या आई प्रेम निंगारेड्डी कोनारेड्डी यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने बळजबरीने ओढून सुसाट वेगात पलायन केले.


🚨 जबरी चोरीचा गुन्हा दाखल
या प्रकरणी फिर्यादी नविनकुमार निंगारेड्डी कोनारेड्डी (रा. शांतीनिकेतन, धारवाड, जि. धारवाड) यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिर्डी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा बीएनएस २०२३ कलम ३०९(४) अन्वये नोंदवण्यात आला असून, तपासाची सूत्रे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहेत.


👮‍♂️ पोलिसांचा शोधमोहीमेला वेग
घटनेनंतर शिर्डी पोलीस ठाण्याचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.
सीसीटीव्ही फुटेज तपासणे, संशयित मोटारसायकलचा माग काढणे, तसेच बाहेरून आलेल्या चोरट्यांचा तपास सुरू असून पोलीस कर्मचारी गलांडे व पोलीस नाईक निवांत जाधव यांची विशेष पथके कार्यरत आहेत.


⚠️ भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर
साईबाबा मंदिर परिसरात भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असताना अशा प्रकारची घटना घडल्याने भाविकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वारंवार घडणाऱ्या चोरी व जबरी चोरीच्या घटनांमुळे पोलिस बंदोबस्ताबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.


🔥 कडक इशारा : आरोपी लवकरच जेरबंद
“ही घटना गंभीर आहे. आरोपी कोणत्याही परिस्थितीत सुटणार नाहीत.
लवकरात लवकर दोन्ही चोरट्यांना जेरबंद करण्यात येईल,”
असा ठाम विश्वास पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी व्यक्त केला आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button