
शिर्डी/ चासनळी जवळ गोदापात्रात ५ वर्षाच्या बालकाचा मृतदेह गाठोड्यात बांधून गोदावरी नदीत फेकून दिल्याची धक्कादायक घटना २० डिसेंबर रोजी उघडकीस आली होती. या घटनेने एकच खळबळ उडाली होती कोपरगाव पोलीसांनी हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या पैलूने गाठोड्यात बांधलेल्या मयत चिमुकल्याची ओळख पटवण्यासाठी तपास सुरू केला होता आरोपीना गजाआड करण्यासाठी पोलीसांनी प्रयत्न सुरू केले आहे .अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे.
मृतदेहाची ओळख पटवणे तपासाचे एक मोठे आव्हान कोपरगाव तालुका पोलिसांसमोर होते होते.उपविभागीय अधिकारी शिरिष वमणे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी अथक परिश्रम घेऊन चिमुकल्याची ओळख पटवली असून त्याचे नाव . कार्तिक ज्ञानेश्वर बदादे वय वर्ष ४ असुन साकुरेमिग निफाड तालुक्यातील साकुरेमिग येथील रहिवासी असल्याचे समजते
मयत कार्तिक बालवाडीत शिकत होता तो हुशार होता कार्तिक हा आईसोबत गेल्या दोन महिन्यापासून होता असे वडीलांनी माहिती दिली आहे.मयत कार्तिकचा मृतदेह त्याच्या वडिलांच्या ताब्यात देण्यात आला आहे. मात्र कार्तिकचा मृतदेह नदीत कसा आला? नेमकं कोणी गाठोड्यात बांधून मृतदेह नदीत आणून टाकला यात कोण सहभागी आहे पोलीस तपासात नेमकं काय ?निष्पन्न होतं याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे