
शिर्डी नगरीत आज अशी शांतता आहे की जणू उद्या प्रचंड वादळ धडकणार आहे. निवडणुकीच्या काळात शहरात गंभीर चर्चा सुरू आहे—शिर्डीसाठी खरे नेतृत्व नेमके कोणाकडे आहे? कारण रिंगणात दिसणाऱ्या चेहऱ्यांमध्ये दूरदृष्टी, अभ्यास, अनुभव आणि शहराबद्दल तळमळ असलेला एकही पक्का नेता दिसत नाही, ही वस्तुस्थिती आता उघडपणे बोलली जात आहे.
गणेश मंडळही सांभाळले नाही… आणि आता नगरपरिषदेचा दावा? शिर्डीकरांचा संताप वाढला
ज्या लोकांनी कधी साधं समाजकार्य किंवा मंडळाची जबाबदारीही नीट सांभाळली नाही, तेच आज राजकारणात पुढे सरसावण्याचा प्रयत्न करत आहेत. शिर्डीतली जनता खुल्या शब्दांत सांगू लागली आहे की—
“काम काहीच नाही… पण खुर्चीची महत्त्वाकांक्षा मात्र आभाळाएवढी!”
दोन नंबरचे धंदे करून पैसे कमावले… आता तोच पैसा राजकारणात? बाबांच्या नगरीला ही काळी छाया नकोच!
दुसऱ्या क्रमांकाचे राष्ट्रीय देवस्थान असलेल्या शिर्डीत, दोन नंबरच्या व्यवहारांतून वाढलेली मंडळी आज राजकारणात घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. बाबांच्या नगरीत अशा लोकांचे अस्तित्वही लाजिरवाणे—आणि नेतृत्व तर दूरची गोष्ट!
भाविक, व्यापारी, सर्वसामान्य जनता एकमुखाने बोलत आहेत:
“शिर्डीला माफिया नव्हे… नेता हवा!”
भाविकांचा सुरक्षिततेचा प्रश्न, व्यापाऱ्यांचे भविष्य, शहराचा विकास—शिर्डीला आता भक्कम नेता हवाच!
शिर्डी ही आंतरराष्ट्रीय पातळीवरील भाविकांची नगरी. दररोज हजारो साईभक्त शहरात येतात.
त्यांच्या सुरक्षिततेसाठी, वाहतुकीसाठी, स्वच्छतेसाठी, व्यापाऱ्यांच्या स्थैर्यासाठी आणि शहराच्या 25 वर्षांच्या भविष्यासाठी आज हवा आहे निर्भीड, अभ्यासू, कणखर आणि दूरदृष्टा नेता.
निवडणूक म्हणजे खेळ नाही…
जो उठेल तो उमेदवार… असं शिर्डीत चालणार नाही.
शेवटी एकच गोष्ट जास्त बोलली जाते—
“चाव्या कितीही तयार होऊद्या… पण शिर्डीचं कुलूप मात्र भक्कम आहे!”
— शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त
किरण एस. गोंदकर पाटील
