शिर्डी :
निवडणुकीच्या तापलेल्या वातावरणात सुजय विखे यांनी केलेल्या वक्तव्याने पुन्हा एकदा शिर्डीतील राजकारणाला ठिणगी मिळाली आहे.
कॉर्नर सभेत मतदारांना संबोधित करताना त्यांनी शिर्डीच्या प्रसादालयाबाबत केलेले विधान सध्या चर्चेचा आणि टीकेचा विषय बनले आहे.
सभेत बोलताना सुजय विखे म्हणाले –
“साईबाबांच्या प्रसादालयात जे मिळतं ते प्रसाद नाही… ते जेवण आहे!
डाळ-भात, बुंदी, मिठाई… हे प्रसाद नसून जेवण आहे.”
त्यांच्या या वक्तव्याने तात्काळ खळबळ उडाली.
🔹 “दारू पिऊन प्रसादालयात जाणारे स्थानिक दारुडे” — सुजय विखेंची थेट टीका
सुजय विखे यांनी आपला सूर आणखी कडक करत म्हटलं—
“शिर्डीतील काही दारुडे दारू पिऊन प्रसादालयात जेवायला जातात.
ह्या चुकीच्या गोष्टी तात्काळ थांबल्या पाहिजेत!”
त्यांनी बाहेरील साईभक्तांची बाजू घेत म्हणलं—
“बाहेरून आलेले भक्त प्रसादालयात आध्यात्मिक भावनेने जातात…
पण स्थानिक काही लोक नशेत तिथे जाऊन वातावरण बिघडवतात.
हे कितपत योग्य?”
🔹 मागील वक्तव्यांवरून झालेल्या देशव्यापी टीकेनंतर पुन्हा एक ‘वादस्पर्शी’ विधान
हे पहिल्यांदाच नाही.
यापूर्वीही सुजय विखे यांनी असाच सूर लावत धार्मिक भावना दुखावतील अशी टिप्पणी केली होती.
त्यावेळी त्यांच्यावर देशभरातून प्रचंड टीका झाली होती.
आणि आता पुन्हा एकदा त्याच प्रकारच्या विधानाने
शिर्डीचा राजकीय वातावरणात वादाचा धूर पसरला आहे.
🔹 समर्थकांची बाजू : ‘शिस्तीबाबत त्यांनी योग्य बोललं!’
दुसरीकडे काही समर्थक म्हणतात—
“दारू पिऊन प्रसादालयात जाणाऱ्यांवर कारवाई व्हावी हे खरंच आहे.
**🔥 शिर्डीमध्ये सध्या एकच चर्चा —
‘विखे यांनी धाडसाने वास्तव बोललं की भक्तांच्या भावनांचा अनादर केला?’ 🔥**
निवडणुकीच्या उंबरठ्यावर हे वक्तव्य किती परिणाम करणार,
कोणाला फायदा आणि कोणाला फटका बसणार…
हे पाहणं आता अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.
