
रक्षाबंधनाच्या पवित्र सणाच्या निमित्ताने श्री साई निर्माण शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष सन्माननीय विजुभाऊ कोते पाटील यांच्या संकल्पनेतून, उपाध्यक्ष ताराचंदजी कोते पाटील, यांच्या प्रयत्नातून , मुख्याध्यापक संदीपजी डांगे सर यांच्या कृतीतून इंग्लिश मीडियम स्कूल मधील विद्यार्थ्यांनी अनोखा उपक्रम राबवला.

याअंतर्गत, विद्यार्थ्यांनी शहरातील शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ, राहता न्यायालय, उपजिल्हाधिकारी आणि शिर्डी नगरपालिका, साईनगर रेल्वे स्टेशन, शिर्डी व राहाता पोलीस स्टेशन, एनडीआरएफ , सैनिक विश्रामगृह आणि शासकीय रुग्णालयात जाऊन विद्यार्थिनींच्या हस्ते पदाधिकाऱ्यांना राख्या बांधण्यात आल्या.
शिर्डी विमानतळावर कार्यरत असणाऱ्या सर्व कर्मचारी , उच्च वर्गातील पदाधिकाऱ्यांना विद्यार्थ्यांनी राखी बांधली. विद्यार्थ्यांच्या या भेटीमुळे आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कुटुंबापासून लांब असल्या कारणामुळे त्यांचे डोळे पाणवले. श्री साई निर्माण शाळेच्या याअनोख्या उपक्रमाचे आभार मानले.
रुग्णालयात सहानुभूती:- शालेय विद्यार्थ्यांनी सुपर हॉस्पिटल व साईबाबा हॉस्पिटलात प्रत्यक्ष भेटीतून, तेथील डॉक्टर व कर्मचाऱ्यांना राखी बांधली. रुग्णांना लवकर बरे होण्याचा संदेश देत, त्यांच्या प्रती सहानुभूती व्यक्त केली. रुग्णांनीही विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले. पदाधिकाऱ्यांनी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचे आभार मानले.
विद्यार्थ्यांनी विश्रामगृहातील सैनिकांना राखी बांधून, औक्षण केले आणि त्यांना मिठाई भरवली. यावेळी, विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कलाकृती आणि शुभेच्छापत्रे भेट म्हणून दिली. सैनिकांनीही विद्यार्थ्यांवर प्रेमाचा वर्षाव करत, त्यांचे आभार मानले.देशाचे रक्षण करताना सैनिकांना कुटुंबांपासून तसेच वेळोवेळी होणाऱ्या सणोत्सवापासून दूर राहावे लागते.मात्र साई निर्माण शैक्षणिक संकुलाच्या उपक्रमामुळे तो साजरा झाला.
या उपक्रमामुळे, विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव जागृत झाली. त्यांनी लोकांच्या दुःखात सहभागी होऊन, त्यांना आनंद देण्याचा प्रयत्न केला. प्रत्यक्ष भेटीची परवानगी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले.या उपक्रमात सहभागी शिक्षकांचेही पालकांनीही कौतुक केले.
काही सर्वं ठिकाणी परवानगी घेऊन प्रत्यक्ष भेटीतून व अनोख्या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी संदेश व राखी पाठवून हा सण साजरा करण्यात आला. श्री साई निर्माण शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष मा. विजूभाऊ कोते पाटील, ताराचंदजी कोते पाटील यांनी या उपक्रमाचे स्वागत करत, शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या उपक्रमामध्ये मुख्याध्यापक चाफेकर सर, पर्यवेक्षक अरबाज पठाण सर, शाळेतील सर्व शिक्षकवृंद यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी ,पालक या सर्वांनी या अनोख्या उपक्रमात उत्साही सहभाग नोंदवला.