Letest News
मोठी राजकीय खळबळ! रुपाली चाकणकर यांचा राजीनामा-खरात प्रकरणाचा मोठा परिणाम शिर्डीत ‘4 एकर’चा स्फोटक घोटाळा-गहाण जमीन थेट विक्रीत-कोट्यवधींचा खेळ उघड! शिर्डीत श्री रामनवमी उत्सवाची भक्तीमय सांगता-दहिहंडी फोडत उत्सवाचा समारोप २ लाखांची लाच घेताना शिर्डीचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी रंगेहात- पुणे महसूल विभाग हादरला भोंदू बाबाशी नाव जोडल्याने केसरकर संतापले ‘राजकीय कट’ असल्याचा थेट आरोप!” “ओळख मान्य पण संबंध नाकारल... शिर्डी गॅस टंचाईप्रकरणी पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन 24 तासांचा अल्टिमेटम समीर वीर आक्रमक शिर्डीत भव्य नेत्र तपासणी शिबिर- १५० रुग्णांना दिलासा मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत शिर्डीत ‘भोंदू बाबाचा’ काळा साम्राज्य उघड! श्रद्धा अश्लील व्हिडिओ-खंडणी आणि बलात्काराचा थरारक गुन्हे... महिलांचे नाव उघड करू नये-कोपरगावात गुन्हा दाखल पोलिसांचे आवाहन: पिडीतांची ओळख जाहीर केल्यास कठोर कार... अहिल्यानगरमध्ये सुट्या पेट्रोल-डिझेल विक्रीवर बंदी जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश
अ.नगरक्राईम

नायलॉन मांजा विक्री करणारे व हा मांजा खरेदी करणारे या सर्वांवर कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी

शिर्डी( प्रतिनिधी)
सध्या मकर संक्रांत जवळ येत असल्यामुळे पतंग मोठ्या प्रमाणात आकाशात उडवले जात आहेत .मात्र पतंग उडवताना नायलॉन मांजाचा वापर अजूनही चोरी चुपके से होत आहे .मात्र अशा नायलॉन मांजामुळे अनेकांना जखमी होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे अशा नायलॉन मांजावर येवला शहरात कडक बंदी करण्यात आली असून त्यासाठी नायलॉन मांजा वापरणाऱ्यांवर ड्रोन द्वारे नजर ठेवली जाणार आहे व असे पतंग उडवणाऱ्या मुलांच्या पालकांवर गुन्हे दाखल होणार आहेत.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

नायलॉन मांजा विक्री करणारे व मांजा खरेदी करणाऱ्यांवरही कारवाई होणार आहे .त्याचप्रमाणेची कारवाई शिर्डी शहरातही करावी .अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून, वाहनधारकांकडून होत आहे.
सध्या मकर संक्रांत जवळ आल्यामुळे सर्वत्र पतंग मोठ्या प्रमाणात उडवले जात आहेत. मात्र त्यासाठी अजूनही अनेकदा नायलॉन मांजाचा वापर केला जातो .असे नायलॉन मांजाला बंदी असतानाही चोरून विक्री केली जाते.

त्यामुळे अजूनही अनेक जण या नायलॉन मांजामुळे जखमी होत आहेत. पक्षी जखमी होत आहेत. त्यामुळे नायलॉन मांजावर बंदीची कडक अंमलबजावणी व्हावी. यासाठी येवला येथे पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. पतंग उडवणाऱ्या व नायलॉन म्हणजे वापरणाऱ्यांवर तसेच त्यांच्या पालकांवरही कारवाई होणार आहे .त्याचप्रमाणे ड्रोन द्वारे या कडे लक्ष दिले जाणार आहे. नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या विक्रेतेवरही कडक कारवाई होणार आहे . येवल्या शहराप्रमाणे शिर्डी शहरातही असा निर्णय घेणे गरजेचे आहे. शिर्डीत मोठ्या संख्येने साईभक्त साई दर्शनासाठी येत असतात.

मात्र अनेकदा पतंग उडवताना पतंगाच्या नायलॉन मांजामुळे पक्षी, साईभक्त ,ग्रामस्थ जखमी झालेले आहेत. त्यामुळे नायलॉन मांजाचा वापर करणारे त्याचप्रमाणे नायलॉन मांजाचा वापर करून पतंग उडवणारे, नायलॉन मांजा विक्री करणारे व हा मांजा खरेदी करणारे या सर्वांवर कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी.

यासाठी शिर्डी पोलिसांनी पावले उचलावी,त नगरपालिकेने त्यासाठी पावले उचलावीत .व नायलॉन मांजाचा वापर आकाशात पतंग उडवताना कुठे चालला आहे हे लक्षात यावे. म्हणून ड्रोन कॅमेरा वापरण्यात यावेत.अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button