वृक्षारोपण करून केली गुरुपौर्णिमा साजरी

राहाता येथील साईयोग फाउंडेशन द्वारे दरवेळी सामाजिक उपक्रम राबवून विविध सण अथवा उत्सव वा महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या केल्या जातात.रविवारी दहेगाव ग्रामस्थांच्या मदतीने योगगुरू सुरेश भिंगारदिवे यांच्या हस्ते खटकाळी परिसर दहेगाव येथे वृक्षारोपण करून गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली.साईयोग फाउंडेशन द्वारे गेली १८ वर्षांपासून रोज पहाटे ५.३० ते ७ पर्यंत राहाता नगरपालिका हॉल मध्ये मोफत योगवर्ग घेणारे योगगुरू सुरेश भिंगरादिवे,विलास वाळेकर व भाऊसाहेब बनकर यांचा फेटा बांधून साईशाल व गुलाबपुष्प देवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सामाजिक कार्यकर्ते दशरथ तुपे यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक केले.ॲड दत्तात्रय धनवटे,नारायण गाडेकर व रविंद्र धस यांनी गुरूंची महती विषद केली.सत्काराला उत्तर देताना योगगुरू सुरेश भिंगारदिवे यांनी गुरुपौर्णिमा साजरी करण्यामागील कारणमीमांसा सांगून सर्वांचे आभार मानले.
याप्रसंगी साईयोग फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ बापूसाहेब पानगव्हाणे,संदीप डांगे, ॲड गोरखनाथ दंडवते,संजय बाबर, सिताराम बावके,बबलू फटांगरे,संजय वाघमारे,विठ्ठल निर्मळ,बाळासाहेब तारगे,पांडुरंग गायकवाड,सुभाष डांगे,प्रभाकर डांगे,रामहरी डांगे,सदाशिव डांगे,माऊली आरणे,शिवाजी पोटे आदी मान्यवर उपस्थित होते. विशेष म्हणजे खटकळी परिसरात वृक्षरोपणाला खड्डे करण्यासाठी माळवदे बिल्डकॉन चे नंदकुमार माळवदे व साईप्रसाद माळवदे यांनी जेसीबी मशिन देऊन अनमोल सहकार्य केले.शेवटी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.