शिर्डी (ता. राहाता, जि. अहिल्यानगर) येथील श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडीट को-ऑप. सोसायटी लि. तर्फे याही वर्षी दीपावली २०२५ निमित्त सप्रेम भेट शिधा वाटप समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम सोमवार, दिनांक ६ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ४.०० वाजता साई उद्यान इमारत परिसर, पिंपळवाडी रोड, शिर्डी येथे पार पडणार आहे.
🙏 कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान व मान्यवर उपस्थिती
या समारंभाचे अध्यक्षस्थान सन्मा. मा. श्री. गोरक्षजी गाडीलकर साहेब (भा.प्र.से.), मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी यांनी स्वीकारले आहे.
कार्यक्रमाला मा. श्री. भिमराजजी दराडे (उपमुख्य कार्यकारी अधिकारी), मा. श्रीमती प्रज्ञा महांडुळे मॅडम (प्रशासकीय अधिकारी) हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
🌼 शुभहस्ते दीपावली भेट वाटप
दीपावली सप्रेम भेट वाटप सुजय विखे यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे.
सभासदांना साखर, गोडतेल व मिठाई अशा स्वादिष्ट भेट शिध्याचे वाटप केले जाईल.
🌺 मान्यवर व अधिकारी उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवणार
या सोहळ्यास मा. श्री. नामदेवजी ठोंवळ (सहा. निबंधक, सह. संस्था, राहाता), मा. श्री. संदीपकुमार भोसले, मा. श्री. वी. डी. दाभाडे, मा. श्रीमती मंगला वराडे, मा. श्री. विश्वनाथ बजाज, मा. श्री. रोहिदास माळी तसेच संस्थेतील सर्व विभाग प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
💐 संचालक मंडळाचे आभार प्रदर्शन व निमंत्रण
संचालक मंडळाच्या वतीने चेअरमन श्री. विठ्ठल तुकाराम पवार तसेच सर्व संचालक सदस्य —
श्री. पोपट भास्कर कोते (उपाध्यक्ष), श्विलास गोरखनाथ वाणी (सचिव), श्री. कृष्णा आरणे, श्री. देविदास जगताप, श्री. इकबाल तांबोळी, श्री. बाबासाहेब अनर्थे, सौ. सुनंदा जगताप, श्री. भाऊसाहेब कोकाटे, श्री. संभाजी कोते आणि इतर मान्यवरांनी सर्व सभासद बंधु-भगिनींना कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
