शिर्डी –
ग्रीन एन क्लीन शिर्डी फाउंडेशन व शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने श्री साईबाबांच्या शिरडीमध्ये प्रथमच ‘श्री साई दिवाळी पहाट’ या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा अद्वितीय कार्यक्रम बुधवार, दिनांक २२ ऑक्टोबर २०२५ रोजी पहाटे ६ वाजता साई समाधी शताब्दी स्टेज (सोळा गुंठे, शिर्डी) येथे पार पडणार आहे.
या दिवाळी पहाटेत साईभक्तांना संगीतमय सुरावटींमधून नववर्षाचे स्वागत करण्याचा मनमोहक अनुभव मिळणार आहे. भाविकांसाठी ही एक आत्मिक आणि सांस्कृतिक मेजवानी ठरणार आहे.
आयोजकांनी सर्व शिर्डीकर व साईभक्तांना आवाहन केले आहे की,
“आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे, आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे,” अशी नम्र विनंती करण्यात आली आहे. 🌼
🌳 ग्रीन एन क्लीन शिर्डी फाउंडेशन व शिर्डी ग्रामस्थ यांच्या वतीने सर्वांना दीपावली व नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌳