
शिर्डी (प्रतिनिधी) —
साईनगरी शिर्डीत दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवसेना संचलित रिक्षा सेना संघटनेतर्फे दीपावलीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला.
शिर्डीतील शिवलय येथे पार पडलेल्या या उपक्रमात फराळ व मिठाईचे वाटप करून रिक्षाचालक बांधवांमध्ये ऐक्य, बंधुभाव आणि सामाजिक जबाबदारीचा सुंदर संदेश देण्यात आला.
हा उपक्रम जिल्हा प्रमुख कमलाकर कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे शिवसेना संचलित रिक्षा सेनेचे आधारस्तंभ राहुल गोंदकर पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आलेले फराळ व मिठाईचे वाटप. रिक्षाचालक बांधवांबरोबर त्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा देवून एकात्मतेचा संदेश दिला.
शिर्डी ही साईबाबांच्या कृपेने आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र बनली आहे. दररोज हजारो साईभक्त शिर्डीत येतात. त्या प्रत्येक भक्ताला सौजन्याने वागविणे, त्यांच्या सोयी-सुविधांची काळजी घेणे आणि शिर्डी शहराची चांगली प्रतिमा जपणे — ही जबाबदारी रिक्षा सेनेच्या कार्यकर्त्यांनी मनापासून स्वीकारली आहे.
रिक्षा सेना हे केवळ रिक्षाचालकांचे संघटन नसून, ती एक सेवाभावाची चळवळ आहे.
रिक्षाचालक केवळ प्रवासी नेण्या-आणण्यापुरते मर्यादित नसून, साईभक्तांना योग्य माहिती देणे, त्यांच्या अडचणींना तत्परतेने मदत करणे, आणि शिर्डीचा सेवाभाव जगभर पोहोचवणे हेच त्यांचे खरे कार्य आहे.
दीपावलीसारख्या सणाच्या निमित्ताने रिक्षा सेनेने आयोजित केलेला हा फराळ वाटप सोहळा म्हणजे शिर्डीतील समाजबंध अधिक घट्ट करणारा आणि शिवसेनेच्या सामाजिक संवेदनशीलतेचे उदाहरण ठरलेला उपक्रम म्हणावा लागेल.
या वेळी नरेंद्र देशमुख गणेश उकिरडे शिवाजी चव्हाण विपिन सोनवणे राजेंद्र आरणे धनंजय देवकर प्रवीण सावंत सुनील बागुल
अजय देवकर अतिश देवकर
विक्रम जाधव संतोष आव्हाळे दत्तू काटकर चेतक साबळे रवींद्र दाभाडे
रामदास धूळसैंदर मच्छिंद्र भगत आप्पा बनकर रामदास साळुंखे सुनील शिंनगारे सागर वाघचौरे योगेश खंडीझोड बाळू बंड
समाधान बाविस्कर अमोल बनकर
सुरेश काटकर अनेक रिक्षाचालक बांधव, शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन उत्कृष्टपणे पार पडले.
शेवटी सर्वांनी “जय साईनाथ! जय महाराष्ट्र! जय भवानी जय शिवाजी जय शिवसेना!” या घोषणांनी वातावरण दुमदुमून टाकले.