बहिणींच झालं दाजींच काय शिवसेनेचे ढाण्यावाघ अरविंद सावंत यांनी शिर्डीत सरकारला डिवचल

अरविंद सावंत यांनी शिर्डीत येऊन साईबाबांचं दर्शन घेतलं. यावेळी साईबाबा संस्थानच्या वतीनं त्यांचा शाल आणि साई मूर्ती देवून सत्कार करण्यात आला. त्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सावंत यांनी लाडकी बहीण योजनेवरुन राज्य सरकारवर जोरदार टीका केली. तसंच बहिणींना पैसे दिले, पण दाजींचं काय? असा खोचक सवालही त्यांनी केला. ते म्हणाले की, “सरकार मनात जे येईल ते करतंय. यामुळं कोर्टानं देखील सरकारला फटकारलंय. राज्य कर्जात बुडालेलं असताना देखील लाडक्या बहिणीसाठी 46 हजार कोटी रुपयांचं कर्ज काढणार. खरा वादा 15 लाखांचा असून त्याहून ते पंधराशे रुपयांवर आलेत. 1500 रुपये किती बहिणींना मिळाले? बर बहिणींना पैसे दिले पण दाजींचं काय? दाजी तर उपाशीच आहे”, अशी खोचक टीका त्यांनी केली.
पोटातलं विष ओठांवर आलं : पुढं ते म्हणाले, “रवी राणा यांच्या पोटातलं विष आता ओठांवर आलय. महाराष्ट्रानं याची दखल घेतली पाहिजे. मध्यप्रदेशातील लाडक्या बहीण योजनेचं पुढं काय झालं याची माहिती घ्या. निवडणुकीपर्यंत हे सर्व सोंग आहे. त्यामुळं सावध रहा. बहिणींनी पैसे घ्या सोडू नका. मात्र, प्रत्यक्षात किती जणींना याचा लाभ मिळतो हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे.” तसंच राजकीयदृष्ट्या महाराष्ट्राला लुटलं जातंय. त्यामुळं आता जण माणसांचे डोळे उघडले पाहिजे. लोकसभेच्यावेळी जे कर्तव्य जनतेनं दाखवलं तेच आता विधानसभेलाही त्यांनी दाखवावं अशी प्रार्थना साईबाबांच्या चरणी केल्याचंही अरविंद सावंत यांनी यावेळी सांगितलं.
अर्थमंत्री अजित पवार यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. या योजनेत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटातील महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळणार आहेत. परंतु, या योजनेवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच धरलय. आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी या योजनेवरून सत्ताधाऱ्यांना डिवचलं आहे