मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले. देशभरातून लाखो महिला-पुरुष भाविकांनी सहभाग घेतला. भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी व्यापक बंदोबस्त ठेवला होता.आधीच मिळवली माहिती – पोलिसांचे नियोजन फळास
पॉकेट चोरी, मोबाईल चोरी, चैन चोरी यांसारखे प्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम राबवली.
पूर्वी ज्या ठिकाणी प्रदीप मिश्रा महाराजांच्या कथा झाल्या होत्या, त्या ठिकाणच्या पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून चोरीच्या प्रकारांची सविस्तर माहिती घेतली.
विशेषतः महिला सेक्टर आणि सभामंडप प्रवेशद्वारांवर साध्या वेशातील पोलिस अंमलदार नेमण्यात आले. या दक्षतेमुळे कथेदरम्यान चोरीच्या घटनांवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळाले.
🛑 गर्दीचा फायदा घेणाऱ्या टोळ्यांवर धडक कारवाई
दि. ११ ते १५ ऑक्टोबरदरम्यान शिर्डी, राहाता आणि लोणी परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी एकूण २० हून अधिक आरोपी महिलांना पोलिसांनी पकडले.
त्यांच्याकडून कटर, ब्लेड, चाकू तसेच वाहन जप्त करण्यात आले. या सर्वांवर भा.न्या. संहिता कलम ३१०(४), ३१०(५) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
👮♂️ संयुक्त पोलिस बंदोबस्तामुळे कथा पार पडली सुरळीत
मा. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार व श्री. सोमनाथ वाघचौरे (अप.पो.अ.), अमोल भारती (उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी), जयदत्त भवर (उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर) यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी, राहाता व लोणी पोलिसांनी संयुक्तरीत्या बंदोबस्त ठेवला.
त्यामुळे शिवमहापुराण कथा कोणत्याही अनुचित प्रकाराशिवाय शांततेत आणि सुरक्षिततेत पार पडली.
२६ आरोपींना अटक; सर्वांची नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवानगी 🛑
अहिल्यानगर (प्रतिनिधी) – शिर्डी परिसरात झालेल्या कारवाईत २३ महिला व ०३ पुरुष अशा एकूण २६ आरोपींना अटक करण्यात आली असून, सर्व आरोपींना नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
ही कारवाई मा. श्री. सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच श्री. सोमनाथ वाघचौरे, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, श्री. अमोल भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी विभाग आणि श्री. जयदत्त भवर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग यांच्या देखरेखीखाली करण्यात आली.
या मोहिमेत रणजित गलांडे, पोलीस निरीक्षक शिर्डी पो.स्टे., नितीन चव्हाण (राहाता), संदीप कोळी (कोपरगाव), प्रविण सांळुके (संगमनेर), संजय सोनवणे (आश्वी), संजय ठेंगे (राहुरी), महेश पाटील (नेवासा), ज्योती गडकरी (सुपा) आणि संतोष खेडकर यांसह विविध पोलीस पथकांनी सहभाग घेतला.
या एकत्रित आणि नियोजनबद्ध कारवाईमुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या नियंत्रणात मोठे यश मिळाल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.