
शिर्डी (प्रतिनिधी) तामिळनाडू मधील दोन आरोपींना तुरुंगातून मुक्त करावे , अन्यथा तामिळनाडूतील साई मंदिर उडवून देण्यात येईल .अशी धमकी देणारा मेल परदेशातून तामिळनाडूतील एका साई मंदिर व्यवस्थापनाला पाठवण्यात आला आहे. मात्र हाच मेल चुकून शिर्डी साईसंस्थानलाही प्राप्त झाल्यामुळे येथेही दक्षता म्हणून साई संस्थांनने या संदर्भात शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. व सुरक्षाही कडक करण्यात आली आहे.

त्यामुळे साई भक्तांनी किंवा ग्रामस्थांनी घाबरून जाण्याचे कारण नाही असे सुरक्षा यंत्रणेने म्हटले आहे. साईभक्तांचे श्रध्दास्थान असलेले श्री.साईबाबांचे समाधी मंदिर एका विनाशकारी पाईप बॉम्बने उडवून देण्याची धमकी अज्ञात आरोपीने ईमेलव्दारे तामिळनाडू मधील एका साई मंदिर व्यवस्थापनाला दिली आहे. हाच मेल चुकून श्रीसाईबाबा संस्थानच्या मेल ॲड्रेसवरही आला आहे.
मात्र या ईमेलची तातडीने दखल घेऊन सुरक्षा यंत्रणेने तपास करत हा मेल परदेशातून आल्याचे व तो तामिळनाडू येथील साई मंदिर व्यवस्थापनाला आल्याचे समजते.मात्र हा फेक मेल चुकून शिर्डी संस्थांनलाही आला. त्यामुळे संस्थांनची सुरक्षा यंत्रणा सज्ज झाली असली तरी साईभक्त ग्रामस्थांनी मात्र त्यानंतर निश्वास सोडला आहे.
पण तरीही साई मंदिर सुरक्षा प्रमुख पोउनि रोहीदास माळी यांच्या फिर्यादीवरून या मेल पाठवणाऱ्या अज्ञात आरोपी विरुद्ध भा. न्या. सं . कलम ३५१ (४) प्रमाणे शिर्डी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . एस.पी राकेश ओला यांचे मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधिक्षक कलुबर्मे यांनी मंदिर व परिसरात भेट दिली असून पोनि गलांडे व पोसई जाधव हे पुढील तपास करीत आहेत.
मात्र या धमकीमुळे साईभक्त ,ग्रामस्थ , सुरक्षा अधिकारी यांच्यामध्ये प्रथम मोठी खळबळ उडाली होती. हा फेक मेल असल्याचे समजल्यानंतर सर्वांनी निश्वास सोडला आहे. तरीही श्री साई संस्थानने सुरक्षा यंत्रणा अधिक कडक केली आहे. साई भक्तांनी व ग्रामस्थांनी व कोणीही घाबरून जाण्याचे कारण नाही .
असे सुरक्षा यंत्रणेने सांगितले आहे. यासंदर्भात सूत्रांकडून मिळालेल्या अधिक माहिती अशी की, साई संस्थांनच्या ई-मेल ऍड्रेस वर अज्ञात आरोपीने श्री साईबाबांचे समाधी मंदिर एका विनाशकारी पाईप बॉम्ब स्फोटात बळी पडेल. असे म्हटले असून मागील मेल हा सुरक्षेची कार्यक्षमता तपासण्यासाठी आणि बीडीडीएस पथकांच्या युक्त्या जाणून घेण्यासाठी होता मात्र हा मेल खरा आहे.
असे म्हटले असून या इंग्रजी भाषेत पाठवण्यात आलेल्या या मेलमध्ये खलील मजकूर आहे , – श्रीमती किरुथिगा उदयनिधी / आयएएस अधिकारी, अॅलेक्स पॉल मेनन,
पवित्र दिवशी, तुमचे श्रीदि साई मंदिर देवस्थानम एका विनाशकारी पाईप बॉम्ब स्फोटात बळी पडेल. हे कृत्य सावुक्कू शंकर आणि जमेश मुबीन यांच्या अन्याय्य फाशीचे स्मरण करते!
मागील मेल कार्यक्षमता तपासण्यासाठी आणि बीडीडीएस युक्त्यांबद्दल जाणून घेण्यासाठी होते. हे खरे आहे!
आम्ही अधिकाऱ्यांना आमच्या सर्वशक्तिमानाच्या नावाने बचाव कार्य करण्याचा प्रयत्न करण्याचे आव्हान करतो.
याच दिवसासाठी आठवड्याच्या शेवटी स्फोटक पद्धतीने तयार केलेले प्रोजेक्टाइल (ईएफपी) रणनीतिकदृष्ट्या ठेवण्यात आले होते. फ्यूजिंग सिस्टम सीईजी गिंडीच्या मेकॅनिकल विभागात तयार करण्यात आले होते आणि या पवित्र मोहिमेसाठी सर्व साहित्य स्वदेशी माध्यमांद्वारे मिळवण्यात आले होते.
आमचे ध्येय स्वर्गाचे साक्षीदार होणे आहे कारण दोन्ही कॅम्पस ढिगाऱ्यात कोसळले आहेत. आज, आम्हीच स्फोट घडवून आणू. ऑपरेशन संपल्यानंतर, आमच्यासोबत आमची हिंदू ओळख नष्ट होईल आणि आम्ही शहीद होऊ! बिलाल – जो आता हे वाचतो – आजचा दिवस आहे. तुम्हाला तुमची भूमिका माहित आहे.
हा आमचा अंतिम संवाद असेल.
संपर्क श्री पी.व्ही. कल्याणसुंदरम आणि DMK बेनामी श्री अर्जुनदुराई राजशंकर DMK अरिवलायमचे गुलाबी लिफाफा आम्ही त्यांना पाठवला आहे. यात आमची कथा आणि DMK कुटुंबाच्या सहभागाचे दस्तऐवजीकरण करणारे व्हिडिओ आहेत. जाफर सादिक आणि जाफर सैत आयपीएस यांच्यावरील खटले रद्द करा.
अल्लाहू अकबर! असा इंग्रजीत मजकूर आहे. हा मेल संस्थांनच्या मेल एड्रेस वर आल्यानंतर मंदिर सुरक्षा प्रमुख पोलीस उपनिरीक्षक रोहिदास माळी यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून अज्ञात मेल पाठवणाऱ्या आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 351 (चार )प्रमाणे पुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक तपास पोलीस करत आहेत. हा मेल तामिळनाडूतील साई मंदिर व्यवस्थापनाला आला होता. तोच शिर्डीत आल्यामुळे येथे प्रथम काहीशी घबराट निर्माण झाली होती. मात्र तपासांअंती हा फेक मेल असल्याचे सुरक्षा यंत्रणाचे म्हणणे आहे.