Letest News
कोपरगाव तालुका पोलीस ठाणे इमारत व 64 कर्मचारी निवासस्थानांचे लोकार्पण #मराठीबातम्या वाढदिवसानिमित्त चक्क ४६ लाखांचे सोने साईचरणी अर्पण३०९ ग्रॅम वजनाचे ६ सुवर्ण ‘ॐ’ अक्षर ... शिर्डीत अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळला-माहिती असल्यास तात्काळ संपर्क साधावा रस्त्याकडेला उभ्या महिलेवर डोळा-पिंपळवाडी–रुई मार्गावर संतापजनक प्रकार दोन हजारांचे आमिष दाखवत विवाह... #MaharashtraPolice#CrimeNews# BreakingNews#शिर्डीत 29 लाखांचा प्रतिबंधित मागुर मत्स्यबिज ट्रक जप्त ... CrimeNews #LocalNews शिर्डीत तरुणाचे अपहरण करून बेदम मारहाण; वीर, वायदंडे यांच्यासह ७ जणांवर गुन्हा राहाता शहरात पारंपरिक पद्धतीने होळी उत्साहात साजरी ग्रो मोअर फायनान्स-1.50 कोटी खंडणीचा महाभंडाफोड! निलंबन पुरेसे नाही — थेट गुन्हा दाखल करा-उच्च न्या-... crime news # पोलीसांनीच पोलिसांवर गुन्हा दाखल राहाता बसस्थानक मारहाण प्रकरणात कोपरगाव पोलीसांसाठी ६४ नवीन निवासस्थानांचे लोकार्पण
राजकीयशिर्डी

#मराठीबातम्या वाढदिवसानिमित्त चक्क ४६ लाखांचे सोने साईचरणी अर्पण३०९ ग्रॅम वजनाचे ६ सुवर्ण ‘ॐ’ अक्षर अर्पण

शिर्डी : देश-विदेशातील कोट्यवधी भाविकांची ज्यांच्यावर अखंड श्रद्धा आहे त्या साई बाबा यांच्या पवित्र भूमीत आणखी एक भक्तीमय आणि भावनिक क्षण अनुभवायला मिळाला. साईचरणी अर्पण होणाऱ्या प्रत्येक देणगीतून भक्तांचा कृतज्ञतेचा भाव व्यक्त होत असतो.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


याच अढळ श्रद्धेचे दर्शन घडवत श्री साईबाबा संस्थान चे माजी अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी आपल्या वाढदिवसाच्या पवित्र औचित्याने श्री साईबाबांच्या चरणी ३०९.५०० ग्रॅम वजनाचे, नाजूक व आकर्षक नक्षीकाम असलेले ६ सुवर्ण ‘ॐ’ अक्षर अर्पण केले. या सुवर्ण अर्पणाची एकूण किंमत तब्बल रु. ४६,०९,०७४/- इतकी असून, हे दान केवळ संपत्तीचे नव्हे तर श्रद्धा, कृतज्ञता आणि समर्पणाचे प्रतीक आहे.


‘ॐ’ हे अक्षर सृष्टीचा आद्यनाद मानले जाते. त्यात संपूर्ण विश्व सामावलेले आहे, अशी हिंदू धर्मातील श्रद्धा आहे. हेच पवित्र ‘ॐ’ अक्षर आता श्री साईबाबांच्या समाधी मंदिरात, श्रींच्या मूर्तीमागील भिंतीवर विधीवत बसविण्यात आले आहे. सुवर्ण तेजाने झळकणारी ही अक्षरे मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या मनात भक्तिभावाची नवीन ऊर्जा जागवतील, यात शंका नाही.
डॉ. हावरे यांनी आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस साईचरणी अर्पण करून “माझे सर्व काही बाबांचेच आहे” हा भाव कृतीतून व्यक्त केला. हा क्षण उपस्थित भाविकांसाठी अत्यंत भावनिक व प्रेरणादायी ठरला.


या भक्तीपूर्ण कार्याबद्दल संस्थानच्या वतीने त्यांचा सत्कार मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात या दानकार्याचे स्वागत केले.
🔸 श्रद्धा असेल तर शब्दांची गरज नसते, कृतीच बोलकी ठरते.
🔸 साईचरणी अर्पण केलेले हे सुवर्ण ‘ॐ’ अक्षर भाविकांच्या श्रद्धेला नवसंजीवनी देणारे ठरेल.
साईनाथ महाराज की जय! 🙏✨

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button