
शिर्डी/ शिर्डी शहर वाहतूक शाखेच्या माध्यमातून अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे उपविभागीय अधिकारी अमोल भारती पोलीस निरीक्षक महेश येसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी शहरात अवैध प्रवाशी वाहतूक करणारी वाहने व विना लायसन विना कागदपत्र दुचाकी व चारचाकी तीन चाकी रिक्षा या वाहनावर निमगाव कोराळे शिवारात नगर मनमाड रोडवर सकाळ पासूनच मोठा पोलीस फौजफाटा घेऊन कारवाई सुरू करण्यात आली होती
यात अनेक वाहनांवर कारवाई करण्यात आली या कारवाईची भनक लागताच अनेक वाहने रस्त्यावरून बेपत्ता झाली या कारवाईत सहाय्यक फौजदार रिजवान शेख मनोज सनानसे प्रसाद इंगळे साईबाबा संस्थानचे सुरक्षा कर्मचारी व होमगार्ड यांची मदत घेऊ कारवाई करण्यात आली
अशाच प्रकारची कारवाई या पुढील काळात देखील सुरू राहणार असल्याचे पोलीस निरीक्षक महेश येसेकर म्हणाले की अवैध प्रवासी वाहतुकीसाठी नेहमीच वाहतूक शाखेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर कारवाया केल्या जात आहेत मात्र अनेक दुचाकी धारकांकडे कागदपत्र नसणे दुचाकी वर नंबर न टाकणे विना लायसन इन्शुरन्स अपूर्ण
अशा अनेक बाबीकडे दुचाकी धारक गंभीरपणे बघत नसल्याने अनावधानाने अपघात झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर अडचणी उभ्या राहतात त्यामुळे ही मोहीम सुरू करण्यात आली असल्याची त्यांनी स्पष्ट केली वाहनधारकांनी आपल्या वाहनांची कागदपत्रे आपल्या जवळ बाळगणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले