Letest News
रामनवमी २०२६ : साईभक्तांच्या पदयात्रेत कीर्तन-प्रवचनांची भक्तीमय मेजवानी #AshokKharat #ShirdiConnection #शिर्डीतून उघड झाला भोंदू साम्राज्याचा काळा खेळ अंधश्रद्धेच्या आडून ल... गुढीपाडवा विशेष : साईनगरीत भक्तीचा महापूर! शिर्डीत आज आणि उद्या दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी शिर्डीत ‘कॅप्टन’ खरातचे जाळे! चाहत्यांपासून कोट्यवधींच्या साम्राज्यापर्यंत – अटकेनंतर खळबळ शिर्डीहून परतणाऱ्या भाविकाला चाकूचा धाक दाखवून लूट-श्रीरामपुरात दोन आरोपी जेरबंद शिर्डीत गॅसचा काळाबाजार? घरगुती सिलेंडरचा हॉटेलमध्ये सर्रास वापर- ९०० रुपयांचा सिलेंडर २ हजारात विक्... साई एम्प्लॉईज सोसायटीचे कार्य ठरले आदर्श-गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिधावाटप कार्यक्रम उत्साहात कृषी क्षेत्र देशाच्या अन्नसुरक्षा व आर्थिक स्थैर्याचा आधारस्तंभ – राज्यपाल जिष्णू देव वर्मा ६०-७० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांची घरे तोडू नयेत-सातबारा देण्याची मागणी शिर्डीत हरवलेले मोबाईल शोधून देण्यात पोलिसांचे कौतुकास्पद काम
क्राईमशिर्डी

शिर्डी पोलिसांची मादक पदार्थ विक्रीविरोधात कारवाई – गुन्हेगारांना थेट इशारा! शिर्डीत अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाहीत पोलीस निरीक्षक रणजित गलांडे

शिर्डी | प्रतिनिधी
शिर्डी शहरातील कोतेगल्ली परिसरात असलेल्या स्वामी समर्थ जनरल स्टोअर येथे अवैधरित्या भांग गोळ्यांची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर शिर्डी पोलिसांनी तातडीने कारवाई करत दुकानावर छापा टाकला. या कारवाईत अथर्व संजय पवार (वय 19, रा. 52 बंगले, एअरपोर्ट रोड, शिवाजीनगर, शिर्डी) याला अटक करण्यात आली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

दि. 17 जानेवारी 2026 रोजी गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या आदेशाने पोलीस पथक तयार करण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक सागर काळे, पोलीस कर्मचारी तुषार दळवी, पंकज गोसावी आदींसह दोन पंचांना बोलावून कारवाईची माहिती देण्यात आली. त्यानंतर पंचनामा साहित्य व इतर साधनांसह पोलीस पथक दुपारी सुमारे 1 वाजता सदर ठिकाणी पोहोचले.


दुकानाची सखोल तपासणी केली असता, जनरल स्टोअरच्या आडून प्रतिबंधित भांग गोळ्या विक्रीसाठी साठवून ठेवल्याचे आढळून आले. तपासादरम्यान खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला –
त्रैलोक्य विजया भांग गोळी – 49 पाऊच (₹490)
आनंद मनुक्का भांग गोळी – 30 पाऊच (₹300)
असा एकूण ₹790 रुपयांचा मादक पदार्थांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.

भांग गोळ्या मानवी आरोग्यास अपायकारक असल्याने, कायदेशीर प्रक्रियेप्रमाणे पंचासमक्ष नमुने काढून उर्वरित माल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी आरोपीची प्राथमिक चौकशी केली असता, सदर भांग गोळ्या संगमनेर येथील रंगारगल्ली, मशिदमागे राहणाऱ्या ‘सिताराम’ नामक व्यक्तीकडून आणल्याची माहिती आरोपीने दिली आहे. या माहितीच्या आधारे आता भांग गोळ्यांच्या पुरवठा साखळीचा तपास करण्यात येत असून, संगमनेर परिसरात पुढील कारवाई होण्याची शक्यता आहे.


या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 65 (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी फिर्यादी म्हणून पोलीस कर्मचारी सोमेश कैलास गरदास यांनी तक्रार दाखल केली असून, आरोपीस कायदेशीर प्रक्रियेनुसार ताब्यात घेण्यात आले आहे.
दरम्यान, शिर्डी परिसरात अवैध मादक पदार्थ विक्रीविरोधात पोलिसांनी आपली कारवाई अधिक तीव्र केली असून, अशा प्रकारांवर कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का, याचाही तपास सुरू आहे.

शिर्डी पोलिसांची धडाकेबाज कारवाई – गुन्हेगारांना थेट इशारा!
शिर्डी पोलिसांनी कोणताही दबाव, ओळख किंवा राजकीय लागेबांधे न पाहता
मादक पदार्थ विक्रीविरोधात थेट कारवाई करून कायदा सर्वांसाठी समान आहे,
हे ठणकावून दाखवले आहे.
पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या नेतृत्वाखाली झालेली ही कारवाई
फक्त एक छापा नसून,
➡️ शिर्डीत अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाहीत
➡️ गुन्हेगार कुणाचाही असो, कायद्यापासून सुटणार नाही
हा थेट इशारा आहे.
👮‍♂️ रणजित गलांडे यांचा स्पष्ट संदेश :
“शिर्डीच्या पवित्र भूमीत मादक पदार्थ, जुगार, गुन्हेगारीला अजिबात थारा नाही.
कायद्याच्या चौकटीबाहेर गेलेला कोणीही असो — कारवाई अटळ आहे!”

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button