अहिल्यानगर | शिर्डी प्रतिनिधी
शिर्डी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आता उलटी गणना सुरू झाली आहे. लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठीची आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर आज अखेर प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे विविध पक्षांच्या संभाव्य उमेदवारांचे चित्र स्पष्ट झाले असून, आता खऱ्या अर्थाने उमेदवार मैदानात उतरून प्रचाराच्या तयारीला लागणार आहेत.

🏛️ शिर्डी नगरपरिषदेची प्रभागरचना व आरक्षण सोडत पुढीलप्रमाणे
प्रभाग क्रमांक प्रकार आरक्षण
प्रभाग 1 (अ) अनुसूचित जाती महिला –
प्रभाग 1 (ब) सर्वसाधारण –
प्रभाग 2 (अ) ओबीसी –
प्रभाग 2 (ब) सर्वसाधारण महिला –
प्रभाग 3 (अ) अनुसूचित जाती –
प्रभाग 3 (ब) सर्वसाधारण महिला –
प्रभाग 4 (अ) अनुसूचित जमाती महिला –
प्रभाग 4 (ब) सर्वसाधारण –
प्रभाग 5 (अ) अनुसूचित जाती महिला –
प्रभाग 5 (ब) सर्वसाधारण –
प्रभाग 6 (अ) अनुसूचित जाती –
प्रभाग 6 (ब) सर्वसाधारण महिला –
प्रभाग 7 (अ) ओबीसी महिला –
प्रभाग 7 (ब) सर्वसाधारण –
प्रभाग 8 (अ) ओबीसी –
प्रभाग 8 (ब) सर्वसाधारण महिला –
प्रभाग 9 (अ) अनुसूचित जाती महिला –
प्रभाग 9 (ब) सर्वसाधारण –
प्रभाग 10 (अ) ओबीसी महिला –
प्रभाग 10 (ब) सर्वसाधारण –
प्रभाग 11 (अ) ओबीसी महिला –
प्रभाग 11 (ब) ओबीसी –
प्रभाग 11 (क) सर्वसाधारण महिला –
🔍 राजकीय समीकरणे आणि उत्सुकता वाढली
या आरक्षण सोडतीनंतर प्रत्येक पक्षातील इच्छुकांनी आपल्या प्रभागात जनसंपर्क वाढवण्यास सुरुवात केली आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना काँग्रेस तसेच मनसे आणि अपक्ष उमेदवारांमध्ये जोरदार चढाओढ पाहायला मिळेल अशी चिन्हे आहेत.
🗣️ नागरिकांमध्ये चर्चेचा विषय
शिर्डी शहरातील नागरिकांमध्ये सध्या चर्चेचा एकच विषय म्हणजे कोणत्या प्रभागातून कोणती दमदार व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरणार? महिला आरक्षित प्रभागांची संख्या यंदा वाढल्याने महिला नेतृत्वाला चालना मिळेल, असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला आहे.
🚩 उमेदवार आता मैदानात
सोडतीनंतर इच्छुक उमेदवारांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत बैठका सुरू केल्या असून, घराघरात संपर्क, मतदार ओळख व गटबांधणीचे नियोजन सुरू झाले आहे. पुढील काही दिवसांतच प्रचाराचे तापमान चांगलेच वाढणार आहे.
📰 — साईदर्शन न्यूज | विशेष प्रतिनिधी, शिर्डी