Letest News
रामनवमी २०२६ : साईभक्तांच्या पदयात्रेत कीर्तन-प्रवचनांची भक्तीमय मेजवानी #AshokKharat #ShirdiConnection #शिर्डीतून उघड झाला भोंदू साम्राज्याचा काळा खेळ अंधश्रद्धेच्या आडून ल... गुढीपाडवा विशेष : साईनगरीत भक्तीचा महापूर! शिर्डीत आज आणि उद्या दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी शिर्डीत ‘कॅप्टन’ खरातचे जाळे! चाहत्यांपासून कोट्यवधींच्या साम्राज्यापर्यंत – अटकेनंतर खळबळ शिर्डीहून परतणाऱ्या भाविकाला चाकूचा धाक दाखवून लूट-श्रीरामपुरात दोन आरोपी जेरबंद शिर्डीत गॅसचा काळाबाजार? घरगुती सिलेंडरचा हॉटेलमध्ये सर्रास वापर- ९०० रुपयांचा सिलेंडर २ हजारात विक्... साई एम्प्लॉईज सोसायटीचे कार्य ठरले आदर्श-गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिधावाटप कार्यक्रम उत्साहात कृषी क्षेत्र देशाच्या अन्नसुरक्षा व आर्थिक स्थैर्याचा आधारस्तंभ – राज्यपाल जिष्णू देव वर्मा ६०-७० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांची घरे तोडू नयेत-सातबारा देण्याची मागणी शिर्डीत हरवलेले मोबाईल शोधून देण्यात पोलिसांचे कौतुकास्पद काम
राजकीयशिर्डी

शिर्डी नगरपरिषद निवडणूक २०२५ : भाजपचा झेंडा बुलंद; जयश्री विष्णू थोरात नगराध्यक्षपदी, दिग्गजांना धक्का

शिर्डी | प्रतिनिधी
शिर्डी नगरपरिषद निवडणूक २०२५ चा अंतिम निकाल जाहीर झाला असून, शिर्डीच्या राजकारणात भाजपने आपला गड भक्कम राखत वर्चस्व सिद्ध केले आहे. नगराध्यक्षपदासाठी भाजपच्या सौ. जयश्री विष्णू थोरात यांनी दणदणीत विजय मिळवत नगराध्यक्षपदाची माळ गळ्यात घातली आहे. त्यांच्या विजयामुळे शिर्डी शहराला अनुभवी, सक्षम आणि विकासाभिमुख नेतृत्व मिळाल्याची भावना नागरिकांत व्यक्त होत आहे.
प्रभागनिहाय निकालात भाजपचे वर्चस्व; अपक्ष व अन्य पक्षांनाही संधी
नगरपरिषदेच्या एकूण प्रभागांमध्ये भाजपने मोठी आघाडी घेतली असून, काही प्रभागांमध्ये अपक्ष आणि अन्य पक्षांच्या उमेदवारांनीही आपली ताकद दाखवली आहे.
प्रभाग क्रमांक १
🔹 निलेश मुकुंदराव कोते (राष्ट्रवादी काँग्रेस)
🔹 सुनिता मंगेश त्रिभुवन (भाजपा)
प्रभाग क्रमांक २
🔹 सतिष (नंदूभाऊ) गोविंदराव गोंदकर (अपक्ष)
🔹 सौ. सुनिता वसंत गोंदकर (भाजपा)
प्रभाग क्रमांक ३
🔹 सौ. आशा कमलाकर कोते (शिवसेना – शिंदे गट)
🔹 बापू पांडुरंग ठाकरे (शिवसेना – शिंदे गट)
प्रभाग क्रमांक ४
🔹 सौ. गायत्री राजेंद्र बर्डे (भाजपा)
🔹 नितीन उत्तमराव कोते (भाजपा)
प्रभाग क्रमांक ५
🔹 अभय दत्तात्रय शेळके पाटील (भाजपा)
🔹 सौ. विद्या शाम जाधव (भाजपा)
प्रभाग क्रमांक ६
🔹 सचिन सीताराम गायकवाड (भाजपा)
🔹 सौ. कोमल किरण बोऱ्हाडे (भाजपा)
प्रभाग क्रमांक ७
🔹 सौ. सरिता गणेश सोनवणे (अपक्ष)
🔹 अमित कैलास शेळके (अपक्ष)
प्रभाग क्रमांक ८
🔹 रविंद्र पांडुरंग गोंदकर (भाजपा)
🔹 सौ. छाया पोपट शिंदे (अपक्ष – बिनविरोध)
प्रभाग क्रमांक ९
🔹 अलका वाल्मीक गोतीस (भाजपा)
🔹 दीपक रमेश गोंदकर (राष्ट्रवादी काँग्रेस)
प्रभाग क्रमांक १०
🔹 सौ. वैशाली दत्तात्रय कोते (भाजपा)
🔹 नितीन पाराजी कोते (शिवसेना – शिंदे गट)
प्रभाग क्रमांक ११
🔹 सौ. छाया सुधीर शिंदे (भाजपा)
🔹 अरविंद सुखदेव कोते (भाजपा)
🔹 प्रतीक्षा किरण कोते (भाजपा)
तीन दिग्गज नेत्यांना पराभवाचा धक्का; भाजपचा किल्ला अभेद्य
या निवडणुकीत तीन दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला, ज्यामध्ये
🔻 अनिता जगताप – माजी उपनगराध्यक्षा
🔻 सुजित गोंदकर – माजी उपनगराध्यक्ष
🔻 योगेश गोदकर
यांचा समावेश आहे. या निकालामुळे मतदारांनी स्पष्टपणे बदलाचा आणि कामगिरीवर आधारित निर्णय दिल्याचे चित्र समोर आले आहे.
शिर्डीच्या विकासासाठी नवी पर्वणी; जनतेच्या विश्वासाची कसोटी
नगराध्यक्षपदी जयश्री विष्णू थोरात आणि बहुसंख्य भाजप नगरसेवक निवडून आल्याने शिर्डी शहराच्या विकासाला आता गती मिळेल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. पाणी, रस्ते, स्वच्छता, पर्यटन, नागरिक सुविधा आणि पारदर्शक कारभार या मुद्द्यांवर नवे नेतृत्व ठोस पावले उचलेल, असा विश्वास शिर्डीकरांमध्ये दिसून येत आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button