Letest News
पत्रकारीता क्षेत्रात शौकतभाई शेख म्हणजे एक प्रेरणादायी व्यक्तीमत्व ज्येष्ठ पत्रकार शौकतभाई शेख यांच्... मागील भांडणाच्या कारणावरून एका कुविख्यात गुंड्याने केले गोळीबार श्रीरामपूर शहर हादरले  थायलंड येथे झालेल्या शरीर सौष्ठव स्पर्धा मध्ये शिर्डी चा निलेश वाडेकर याने मिळवले ब्रांझ मेडल कोट्यावधिचे मुद्देमाल जप्त करत नगर गुन्हे अन्वेषण पथकाने केली कामगीरी भारी !! शरद पवारास जिल्हाधिकारी साहेबांचा चांगलाच हिसका ! शेतकऱ्याचा चोरीस गेलेला जेसीबी मोठया शिताफिने हस्तगत स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई कोयता व सुऱ्याचा धाक दाखवुन लुटमार करणाऱ्या दोन टोळयांमधील 4 आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद शिर्डी वाहतूक शाखेकडून नाकाबंदी करून कारवाई पोलीस निरीक्षक महेश येसेकर देह व्यापार रोखण्यासाठी पोलिसांनी केले चार हॉटेल सील हॉटेल् सील झाल्यामुळे परिसरात मोठी खळबळ गणेशोत्सवात ‘बाप्पाच्या गप्पा’ उपक्रमांतर्गत रस्ता सुरक्षा जनजागृती
अ.नगरराजकीय

पत्रकारीता क्षेत्रात शौकतभाई शेख म्हणजे एक प्रेरणादायी व्यक्तीमत्व ज्येष्ठ पत्रकार शौकतभाई शेख यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने

अहिल्यानगर जिल्ह्याच्या श्रीरामपूर शहरातील ज्येष्ठ पत्रकार शौकतभाई शेख हे महाराष्ट्रातील एक प्रामाणिक, सच्चे आणि दुसऱ्याच्या मदतीसाठी नेहमी तत्पर असणारे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांच्या सामाजिक कार्याची आणि पत्रकारितेतील महत्वपूर्ण योगदानाची केवळ अहिल्यानगर जिल्ह्यातच नव्हेतर संपूर्ण राज्यभरात
एक वेगळीच ओळख निर्माण झालेली आहे. विशेषतः नवोदित संपादकांसाठी ते आधारवड ठरले आहेत.

sai nirman
जाहिरात

शौकतभाई हे अनेक नवोदित संपादक, पत्रकारांचे गूढारंभातील मार्गदर्शक राहिले आहेत. पत्रकारिता हे क्षेत्र जसे कठीण, तितकेच जबाबदारीने वागणारे आहे. अशा क्षेत्रात काम करत असताना अनेक पत्रकार अडचणीत सापडतात, दिशा हरवतात. अशा वेळी शौकतभाई त्यांना योग्य मार्गदर्शन करून उभे करतात. म्हणूनच अनेक पत्रकार त्यांना “गुरू” म्हणून मानतात.

राजकारण विरहित सर्व धर्मिय सेवाभावी संस्था असलेल्या समता फाउंडेशन या सेवाभावी संस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष असून समाजात समता, न्याय, बंधूता आणि जनहक्क यासाठी ते सातत्याने काम करत असतात. समाजातील दुर्लक्षित, दुर्बल, वंचित, आणि गरजू लोकांसाठी ते आवाज उठवत असतात. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक सामाजिक उपक्रमे राबवली गेले असून त्यांनी अनेकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणले आहेत.

DN SPORTS

शौकतभाई हे एका दैनिक वर्तमानपत्राचे सशक्त संपादकही आहेत. त्यांनी आपली लेखणी समाजहितासाठी वापरली आहे. ते नेहमीच अन्याय, भ्रष्टाचार समाजातील अडचणी तथा समाजहितैशी याबाबत निर्भीडपणे लिखाण करत असतात. त्यांची पत्रकारिता समाजाभिमुख असून त्यांनी नेहमीच लोकांचे प्रश्न शासन दरबारी पोहोचवले आहेत.

आजही त्यांचा संघर्ष सुरू आहे. वय किंवा परिस्थिती कधीच त्यांच्या ध्येयापासून त्यांना परावृत्त करू शकत नाही. त्यांनी अनेकांना मदतीचा हात दिला आहे आणि अजूनही देत आहेत. त्यामुळे त्यांना सामाजिक क्षेत्रात मोठा मान सन्मान आहे.

एकूणच शौकतभाई शेख हे समाजासाठी झटणारे, पत्रकारितेच्या मूल्यांना जपणारे आणि प्रत्येक अडचणीत असणाऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांचं कार्य अतुलनीय आहे आणि त्यांच्या सारख्या व्यक्तीमुळेच समाजात अजूनही माणुसकी शाबूत असलल्याचे प्रथमदर्शनीच दिसून येते.

कारण शौकतभाईंनी शैक्षणिक दशेत असताना आगदी वयाच्या आवघ्या १७ व्या वर्षीच सन १९८४ साली पत्रकारीतेत पहिलं पाऊल टाकत एका साप्ताहिक वर्तमानपत्राचं प्रतिनिधीत्व मिळवलं, कालंतराने त्यांची सामाजाभिमुख पत्रकारीता फुलत गेली, पुढे १९८९ साली राहुरी येथील सय्यद निसारभाई यांच्या साप्ताहिक भडक्त्या ज्वाला चे अस्तगांव परिसर प्रतिनिधीत्व मिळवलं,
पुढे १९९१ साली त्यांनी दक्ष पोलिस समाचार या साप्ताहिक वर्तमानपत्राचे संपादन केले. १९९२ साली
दैनिक लेखणीचा न्याय या दैनिकाचे कार्यकारी संपादक पद सांभाळले, १९९६ साली त्यांनी स्वतः चे साप्ताहिक दक्ष पोलिस टाईम्स हे वर्तमानपत्र सुरु केले.
परंतु विविध ठिकाणी वाढता भ्रष्टाचार बघून १९९७ साली त्यांनी महाभ्रष्टाचार नामक पाक्षिकाची मुहुर्त मेढ रोवली आणी आपल्या धारदार लेखणीद्वारे भ्रष्टाचाऱ्यांवर प्रहार चढविला,यासोबतच विविध दैनिक, साप्ताहिक वर्तमानपत्र तसेच एस न्यूज मराठी, तिरंगा न्यूज, कॉमन न्यूज आदि स्थानिक वृतवाहिन्यांमध्ये त्यांनी स्क्रिप्ट रायटर ते निवेदक आणी वृत्तसंपादक म्हणून कामे पाहिले, पुढे २०१० साली त्यांनी सायंदैनिक साईसंध्या नामक शिर्डीतून पहिलं दैनिक वर्तमानपत्र सुरु केलं.तसेच दैनिक विदर्भ सत्यजित, दैनिक साईदर्शन, दैनिक जलभूमी, दैनिक कॉमन न्यूज, दैनिक शौर्य स्वाभिमान, दैनिक नगरशाही, दैनिक विजयसत्ता, साप्ताहिक समतादूत, साप्ता. शिर्डी एक्सप्रेस, साप्ता. भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन, साप्ता.भवानीमाता, साप्ता. खरे सव्वाशेर, साप्ता. साईगंगा, साप्ता. परिवहन समाचार असे कित्येक वर्तमानपत्रात त्यांना मार्गदर्शक संपादक म्हणून मानाचं स्थान आहे, यासोबतच नवोदित पत्रकार, संपादकांना शेकडो दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिकाचे रजिस्ट्रेशन मिळवून दिली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात कित्येक दैनिके, साप्ताहिके, पाक्षिके ,मासिके तथा न्यूज पोर्टल्स आणी स्थानिक वृत्तवाहिन्या मोठ्या दिमाखात सुरु आहेत, म्हणून आज अनेको वर्तमानपत्रांच्या आगदी दर्शनी भागावर मार्गदर्शक संपादक म्हणून त्यांचं नाव टाकलं जाते हा त्या संपादकांचाही मोठेपणाच होय.

३० ऑगस्ट या त्यांच्या ५८ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना खुप खुप मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा तसेच येणाऱ्या भावी जीवनात त्यांना सुखसमृद्धी भरभराटी यासोबतच उत्तम आरोग्यदायी जीवन लाभो ही सदिच्छा !

kamlakar

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button