Letest News
पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपट टीमचे श्री साईबाबा समाधी दर्शन शिवमहापुराण कथा –पोलिसांचे नियोजन फळास गर्दीचा फायदा घेणाऱ्या टोळ्यांवर धडक कारवाई-२६ आरोपींना अटक मिश्राला साईबाबांची एलर्जी महाराष्ट्र हि साईंची शिवांची आणि संतांची भूमी साईबाबा हे आमचे देवचं नाहीत... रेखा जरे हत्याकांडात मोठी घटना! — बाळबोठे यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर कोपरगाव – करंजी शाळेत दाखले वाटप; नायब तहसीलदार सातपुते यांच्या उपस्थितीत उपक्रमाची प्रशंसा साईभक्त जितेंद्र उमेडी यांनी श्री साईबाबांच्या चरणी तांब्याची छत्री केली अर्पण आजचा दिवस शिर्डीकरांसह संपूर्ण साईभक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि भावनिक —श्री साईबाबा महासमाधी दिन गुन्हे प्रतिबंध आणि पुढील योजना-ऑपरेशन मुस्कान – पार्ट 2 : शालेय विद्यार्थ्यांमध्ये जागृती अभियान निवडणूक आयोग हरिश्चंद्र नाही' उद्धव संतापले -मतदार यादी दुरुस्त करा- नंतरच निवडणुका राज ठाकरे-मतदार ... शिवसेनेच्या (ठाकरे गट) नवीन जिल्हा कार्यकारिणीने संगमनेर तालुक्यात उत्साहाचा नवा संचार
क्राईमशिर्डी

शेअर ट्रेडिंग कंपनीचा घोटाळा उघड! गुन्हा दाखल!मा. कोर्टाने जमीन अर्ज फेटाळला! शिर्डीतही असाच शेअर्स घोटाळा उघड होण्याची शक्यता

शिर्डी (प्रतिनिधी) शेअर मार्केटमध्ये पैसे दुप्पट करुन देतो, असे आमिष दाखवत ६००-७०० जणांना तब्बल १०० कोटींवर फसवणूक केल्याप्रकरणी संभाजीनगरातही एस. एम. कॅपिटल आणि लक्ष्मी कॅपिटलच्या संचालकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. या संचालकांपैकी एक असलेला विष्णू कमलराव भोसले (५७, रा. प्राध्यापक कॉलनी, ता. कन्नड) याने सादर केलेला अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. एस. मोमीन यांनी नामंजूर केला आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

शेवगाव ,कोल्हापूर ,सातारा व आता संभाजीनगर येथेही असा प्रकार उघडकीस आला आहे. शिर्डी तही असा प्रकार घडला आहे मात्र तो खाजगीत चर्चेला जात आहे. आर्थिक गुन्हे शाखेने या शिर्डीतील शेअर्स घोटाळा प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी खाजगीत गुंतवणूकदार करत आहेत. छत्रपती संभाजी नगर येथील
विष्णू भोसले याने गुंतवणूकसाठी नगदी रक्कम घेवून ती एस.एम. कॅपिटल ग्रोथ या कंपनीत गुंतवलेली होती.


शेअर बाजारात पैसा दुप्पट करण्याच्या आमिषाने एस. एम. कॅपिटल आणि लक्ष्मी कॅपिटलविरोधात आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार करण्यात आली आहे. आतापर्यंत ५२ गुंतवणूकदार तक्रारीसाठी पुढे आले आहे. मराठवाड्यातील ७०० गुंतवणूकदारांना सुमारे १०० कोटींना या कंपनीने गंडा घातला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे त्यात निवृत्त पोलीस, लष्करी जवान आणि शिक्षक यांचा समावेश आहे.


गुंतवणूकदारांना दरमहा दहा टक्के रक्कम मुद्दल व व्याज मिळेल असे भोसलेने सांगितले होते.पण या
गुंतवणुकीतील रक्कमेतून दरमहा मिळणारी रक्कम बंद झाल्यानंतर
काही तक्रारदार हे भोसले याच्याकडे गेले होते. त्यावेळी त्याने सांगितले की,

वारंवार त्रास देवून नका, तुमची रक्कम लवकरच परत मिळेल, असे सांगितले होतें.पण रक्कम परत मिळेना , म्हणून तक्रार करण्यात आली.तपासादरम्यान एस. एम. कॅपिटल ग्रोथ आणि लक्ष्मी फायनान्स सर्व्हिसेस
कंपनीत सुमारे ६०० ते ७०० लोकांनी गुंतवणूक केली असल्याची माहिती समोर आली आहे,

या प्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे देखील न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. त्यावरून आरोपीचा जामीन नामंजूर करावा, अशी विनंती करण्यात आली.
आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेकडे केलेल्या लेखी तक्रारीनुसार गारखेड्यातील खिंवसरा पार्क येथील एस. एम. कॅपिटल आणि लक्ष्मी कॅपिटल कंपनीचे मालक मनोज विष्णू भोसले, सुनील प्रभाकर उगलमुगले यांनी गुंतवणूकदारांना १ लाखाचे २० महिन्यांत २ लाख करून देण्याच्या योजनेवर पैसे घेतले.


दर महिन्याला १० हजार याप्रमाणे हे २० हप्ते होते. काही महिने नियमितपणे दिले. डिसेंबरमध्ये ५ हजार मिळाले आणि जानेवारीपासून टाळाटाळ सुरू केली. प्रकरणात जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असे अनेक प्रकार महाराष्ट्रात दिवसेंदिवस उघड होत आहे .शेवगाव कोल्हापूर सातारा नंतर संभाजीनगर मध्ये हा प्रकार घडला आहे

त्यामुळे शिर्डीत शेअर्स मार्केटमध्ये गुंतवणूक करून मोठे व्याजदर देण्याचे आमिष दाखवून कोट्यावधी रुपये गोळा केले आहेत. मात्र ही कंपनी आता वेगवेगळे आश्वासन देत आहे. शिर्डीतील ग्रो मोर शेअर्स ट्रेडिंग कंपनी आता कुठे आहे. तिचा चालक-मालक कुठे आहे. या संदर्भात वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर व्हिडिओद्वारे आपण लवकरच शिर्डीला येऊ असे म्हणणारा या कंपनीचा चालक मात्र अजूनही शिर्डीत दिसत नाही.

गुंतवणूकदारांना भावनिक आवाहान करून स्वतःच्या घोटाळ्यावर पांघरून टाकण्याचा तर हा प्रकार नाही ना? अशी गुंतवणूकदारांमध्ये सध्या चर्चा सुरू झाली आहे. आर्थिक गुन्हे शाखेने या शिर्डीतील आर्थिक घोटाळा प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी आता खाजगी मध्ये गुंतवणूकदार करत आहेत.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button