अहिल्यानगर प्रतिनिधी | दि. 28 ऑक्टोबर 2025

भ्रष्टाचाराविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आणखी एक कारवाई करत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (महा.वि.वि.को.) येथील वरिष्ठ तंत्रज्ञास रंगेहात पकडले आहे.
अरणगाव शाखा कार्यालय (ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) येथे कार्यरत लोकसेवक श्री. सुनिल रघुनाथ नागरे (वय 54) यांनी ₹700/- ची लाच स्वीकारल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
⚖️ सौर कृषी पंप बसविण्यासाठी मागितली लाच!
तक्रारदाराने “मागेल त्याला सोलर कृषी पंप योजना” अंतर्गत आपल्या शेतीसाठी सौर पंप मिळावा म्हणून 6 ऑक्टोबर 2023 रोजी ऑनलाईन अर्ज केला होता. शासनाकडून मंजुरी मिळाल्यानंतर 1 फेब्रुवारी 2025 रोजी तक्रारदाराने ₹32,075/- इतकी अधिकृत ऑनलाईन फी भरली होती.
त्यानंतर दि. 26 ऑक्टोबर 2025 रोजी महावितरण कंपनीचा कंत्राटी वायरमन ईरकर यांनी सर्वेक्ष
ण पूर्ण केले. सर्वेची नोंद लोकसेवक सुनिल नागरे यांच्या अॅप्लिकेशनवर करण्यात आली. त्यानंतर तक्रारदाराने नागरे यांच्याशी फोनवर संपर्क साधून पंप बसविण्याबाबत चौकशी केली असता, नागरे यांनी 1000 रुपयांची लाच मागितली होती.
🚨 लाचलुचपत विभागाची सापळा कारवाई — 700 रुपयांची रक्कम स्विकारताना पकडले!
तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहिल्यानगर येथे 27 ऑक्टोबर 2025 रोजी तक्रार दाखल केली होती. विभागाने तक्रारीची पडताळणी करून 28 ऑक्टोबर 2025 रोजी सापळा रचला.
सापळा दरम्यान श्री. सुनिल रघुनाथ नागरे यांनी तक्रारदाराकडून ₹700/- लाच रक्कम पंचासमक्ष स्वीकारली, त्याच वेळी अहिल्यानगर लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने त्यांना रंगेहात पकडले.
ही कारवाई भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 च्या कलम 7 अंतर्गत करण्यात आली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
👮♂️ पथकाचे कौतुकास्पद कार्य — भ्रष्टाचाराविरुद्ध ठोस पाऊल!
संपूर्ण कारवाई पोलीस निरीक्षक श्री. राजु आल्हाट (ला.प्र.वि. अहिल्यानगर) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
पर्यवेक्षण अधिकारी: पोलीस उपअधीक्षक श्री. अजित त्रिपुटे
सहाय्यक अधिकारी:
पोना/709 चंद्रकांत काळे
पोकों/2262 शेखर वाघ
पोकों/2579 किशोर कुळघर
चालक पोहेकों हारुन शेख
कारवाईसाठी मार्गदर्शन —
मा. श्री. भारत तांगडे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नाशिक परिक्षेत्र
मा. श्री. माधव रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक
मा. श्री. सुनिल दोरगे, अपर पोलीस अधीक्षक
📢 लाचलुचपत विभागाचे नागरिकांना आवाहन
लाच मागणारा कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी आढळल्यास तात्काळ तक्रार नोंदवावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य यांनी केले आहे.
📍 संपर्क पत्ता:
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालय,
जिल्हा मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, टी.व्ही सेंटर समोर, सावेडी, अहिल्यानगर.