नातवाच्या खांद्यावर बसून आजी वारीला

पंढरीच्या दिशेने चाललेल्या ज्ञानोबारायांच्या पालखी सोहळ्यात फलटणच्या सुंदर आजी नातवाच्या खांद्यावर बसून पंढरपूरला निघाल्यात. नातवाच्या खांद्यावर बसून विठुरायाचे त्यांना दर्शन घ्यायचं आहे. वय वर्ष नव्वद..पण पंढरीला जाण्याची ओढ मात्र अगदी तरुणपणाची… गेली १० वर्षे त्या पायी पंढरीला जातात. गेल्या तीन वर्षांपासून गुडघे थकले, दमले. त्यामुळे चालता येत नाही, अशावेळी त्यांचा नातू त्यांचा आधार बनला.पुण्यासारख्या महागड्या शहरांमध्ये मॉलमध्ये काम करणारा प्रशांत नावाचा नातू या सुंदर आजींसाठी सारथी बनला आहे. या प्रशांतच्या तर कधी दुसरा नातू महेशच्या खांद्यावर बसून सुंदर आजी हात जोडून पंढरीला निघाल्या आहेत. माझ्या आजीला पंढरपूरचा पांडुरंग दाखवायचा आहे, तर त्याचा त्रास कशाचा? उलट आजीच्या निमित्ताने माझी दर्शन वारी घडतीये, माझं व्रत कामाला आल्यासारखं वाटत आहे. त्यामुळे उलट मला खूप मनापासून आनंद वाटतो असे प्रशांत यांवी सांगितले.