Letest News
१५० रुपयांच्या तंबाखूवर धाडसी कारवाई, पण शिर्डी राहात्यात कोट्यवधींच्या गुटखा तस्करीला अभय! शिर्डीत दलालगिरीला लगाम! भाविकांची अडवणूक करणाऱ्यांवर कलम १५२ चा चाबूक बंद दरवाजामागचं गूढ उघडलं- शिर्डीत हॉटेल कामगाराचा गळफास-कारण अद्याप गुलदस्त्यात झिरो टॉलरन्सचा बडगा! शिर्डीतील २ गुन्हेगारांसह ३२ सराईत आरोपींवर तडीपार प्रस्ताव नियम पाळा-नाहीतर कारवाई! शिर्डीत रिक्षाचालकांना पोलीस निरीक्षक महेश येसेकरांचा इशारा दुःखातून सेवेकडे… साईबाबा संस्थानच्या आवाहनाला प्रतिसाद-नेत्रदानातून अनेकांना नवी दृष्टी शिर्डी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी-देशभरातील ७ राज्यांत शोधमोहीम-हरवलेले ५० महागडे मोबाइल शोधून मूळ ... श्रद्धेचे सुवर्ण अर्पण-येथील साईभक्त आरती बिहानी यांचे ११.९९ लाखांचे सोन्याचे ब्रोच श्री साईचरणी अर्... ग्रामीण स्वप्नांना सरकारी नोकरीची वाट-शिर्डीच्या साई निर्माण करिअर अकॅडमीमधून ७० जण सेवेत साईनगरीत गुन्हेगारांचा मोकळा संचार! दीड लाखांचे मंगळसूत्र हिसकावून चोर फरार 🚨
Blog

नववर्ष स्वागतासाठी साईनगरी भक्तीरसात न्हाऊन निघाली-२५ डिसेंबरपासून भाविकांचा विक्रमी ओघ एक लाखांहून अधिक दर्शन

नववर्ष स्वागतासाठी साईनगरी भक्तीरसात न्हाऊन निघाली-२५ डिसेंबरपासून भाविकांचा विक्रमी ओघ एक लाखांहून अधिक दर्शन,

सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाच्या स्वागतासाठी अवघी शिर्डी साईमय झाली आहे. नाताळच्या सुट्यांच्या सुरुवातीलाच देश-विदेशातून आलेल्या लाखो साईभक्तांनी साईदरबारी हजेरी लावली असून “साई राम, साई राम” च्या जयघोषाने संपूर्ण साईनगरी दुमदुमून गेली आहे. श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भाविकांचा अक्षरशः महासागर उसळलेला पाहायला मिळत आहे.

sai nirman
जाहिरात

२५ डिसेंबरपासून भाविकांचा विक्रमी ओघ, एक लाखांहून अधिक दर्शन

२५ डिसेंबर रोजी नाताळ सणाच्या दिवसापासून शिर्डीत भाविकांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. गुरुवारी दिवसभरात सुमारे एक लाख भाविकांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले, तर साई संस्थानच्या महाप्रसादालयात ५० ते ५५ हजार भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला. शाळा व महाविद्यालयांना लागलेल्या सुट्ट्यांमुळे भाविकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

DN SPORTS

पायी पालख्या, पदयात्रांचा लोंढा; शिर्डीत भक्तीमय वातावरण

विविध राज्यांतून पायी पालख्यांसह हजारो पदयात्री शिर्डीकडे मार्गस्थ झाले आहेत. नगर–मनमाड महामार्गावरून अनेक पालख्या शिर्डीकडे येत असून सध्या सुमारे ५३ पालख्यांची नोंद झाली आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या पदयात्रींमुळे शिर्डी परिसरात भक्तीचे वेगळेच वातावरण निर्माण झाले असून साईनामाचा अखंड गजर सुरू आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button