शिर्डी साई संस्थान एम्प्लॉइज क्रेडिट को-ऑप सोसायटीची ११ फेब्रुवारी १७ जागेसाठी होणार असून ही निवडणूक अनेकांनी प्रतिष्ठेची केली आहे. सत्ताधारी गटाकडून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खा. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली विद्यमान चेअरमन श्रद्धा विजय कोते , माजी चेअरमन तुषार शेळके, प्रताप कोते, यादवराव कोते यांचा साई जनसेवा तर माजी चेअरमन राजेंद्र जगताप यांनी साई हनुमान जनसेवा पॅनल तयार केला आहे तर विद्यमान संचालक विठ्ठल पवार यांनी परिवर्तन विकास मंडळाच्या माध्यमातून निवडणूकीच्या रिंगणात उतरले असून अरूण जाधव यांनी देखील वेल्फेअर संघटनेच्या माध्यमातून पॅनल तयार करण्याच्या हालचाली सुरू केल्याने शिर्डी साई संस्थान एम्प्लॉइज सोसायटीच्या निवडणुकीत चौरंग लढत होणार की काय अशी चर्चा सुरू आहे. असे असले तरी १६ ते ३० उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी मोठा कालावधी असल्यामुळे या दरम्यान निवडणुकीत काय घडामोडी होतात हे खऱ्या अर्थाने समजेल मगच निवडणुकीत रंगत येईल सोमवारी १५ जानेवारी रोजी १३३ पैकी ७ उमेदवारांनी दोन ठिकाणी अर्ज दाखल केले असल्यामुळे सर्वच उमेदवारांचे उमेदवार अर्ज वैध राहिल्यामुळे व उमेदवारी अर्जावर कोणत्याही हरकती न आल्यामुळे १२६ उमेदवार अर्ज वैध राहिले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रावसाहेब खेडेकर काम बघत आहे. या बहुचर्चित सोसायटी निवडणुकीत खा डॉ सुजय विखे पाटील यांची भूमिका सर्वात महत्वाची असणार असून हि निवडणूक बिनविरोध होण्यासाठी खा सुजय विखे पाटील काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे . निवडणुकीत खा.डॉ. सुजय विखे पाटील हे सत्ताधारी व त्यांच्या विरोधी गटाचा कसा मेळ घालून मार्ग काढतात याबाबत सर्वांना उत्सुकता लागली असून ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा सभासदांकडून केली जात आहे मात्र त्यातच आता परिवर्तन विकास मंडळाच्या माध्यमातून संचालक विठ्ठल पवार यांनी येत्या 20 तारखेला आपल्या पॅनलचे अधिकृत उमेदवार घोषित करणार असल्याचे सांगितल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याच्या शक्यतेवर सध्या तरी शिक्कामोर्तब झाले नसल्याचे चित्र आहे यापुढील काही दिवसात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याच्या शक्यतेने या निवडणुकीकडे राजकीय नेत्यांसह,संस्थान कर्मचारी, सभासदांसह ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे
जाहिरात
DN SPORTS