Letest News
शिर्डी पोलिसांची दमदार कामगिरी!मंदिर परिसरातून बेपत्ता झालेली १२ वर्षीय चिमुरडी काही तासांत सुखरूप आ... शिर्डीत हॉटेल व्यावसायिकाला मारहाण तक्रार दिल्याचा राग मनात धरून जीवे मारण्याची धमकी पालकमंत्र्यांच्या बैठकीकडे भाजप पदाधिकाऱ्यांची पाठ; विखे यांना कर्जतमध्येच धक्का? शिर्डीतील 'झिंग्या'वर एमपीडीएचा बुलडोझर- खून-अपहरण-मारहाण करणाऱ्या सराईत गुन्हेगाराची थेट नाशिक कारा... लेंडीबागेत नव्हे तर आरक्षित जागेवर उभारा भव्य श्रीराम-श्रीकृष्ण मंदिर! शिर्डी ग्रामस्थांचे साई संस्थ... शिर्डीत हॉटेल व्यावसायिकाला मारहाण तक्रार दिल्याचा राग मनात धरून जीवे मारण्याची धमकी शिर्डी गुटखा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न? थेट लोकायुक्त- एसीबी आणि आयुक्तांकडे धडक-एफडीए अधिकाऱ्यांच्या... शिर्डीचा विकास थांबवणारे नेमके कोण? — ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र बनकर यांचा परखड सवाल शिर्डीतील रिक्षा लूट प्रकरणाने उघडे पाडले गंभीर प्रश्न! शिर्डीत भाविकांची अडवणूक करणाऱ्यांवर पोलिसांचा दणका!
क्राईमशिर्डी

बारकोडचा गैरवापर करून उत्पन्नाचा खोटा दाखला देणाऱ्या पिंपळवाडी येथील ऑपरेटरवर गुन्हा

शिर्डी, दि. १२ – तहसील कार्यालयाने आधीच इतर व्यक्तीसाठी दिलेल्या उत्पन्नाच्या दाखल्याचा बारकोड वापरून दुसऱ्या व्यक्तीसाठी खोटा दाखला तयार करत शासनाची फसवणूक केल्याच्या प्रकरणी पिंपळवाडी ग्रामपंचायत ऑपरेटरविरुद्ध शिर्डी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

याप्रकरणी रवींद्र नारायण देशमुख (वय ५२, महसूल सहाय्यक, राहाता तहसील कार्यालय) यांनी तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार, दिनांक ११ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता ज्ञानदेव कंस वाकचौरे (वय २३, रा. पिंपळवाडी) नावाचा युवक त्यांच्या कार्यालयात आला. त्याने मिळालेला उत्पन्नाचा दाखला तपासून पाहण्याची विनंती केली.

दाखल्यावरील बारकोड क्रमांक तपासला असता तो दाखला प्रत्यक्षात नवनाथ आनारसे या व्यक्तीसाठी दिनांक १९ मे २०२५ रोजी तहसीलदारांनी दिलेला असल्याचे समोर आले.

याबाबतची माहिती श्री.देशमुख यांनी तहसीलदार अमोल मोरे यांना दिली. तहसीलदारांनी माहितीची शहानिशा करून तपास केला असता त्यांना सदर दस्तऐवज खोटा आढळून आला.

त्यासाठी तहसील कार्यालयाच्या बारकोडचा गैरवापर करण्यात आला आहे. पुढील तपासात स्पष्ट झाले की, ग्रामपंचायत पिंपळवाडीचा ऑपरेटर प्रविण गोरक्षनाथ रोठे (वय २७) याने नवनाथ आनारसे यांना दिलेल्या दाखल्यावरील बारकोड व डिजिटल सहीचा वापर करून तोच दाखला बनावट स्वरूपात ज्ञानदेव वाकचौरे याला दिला.

हा प्रकार लक्षात आल्यानंतर रवींद्र देशमुख यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत फसवणूक व अन्य कलमांखाली प्रविण रोठेविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button