शिर्डी (प्रतिनिधी)
शिर्डी येथील श्री साईबाबांच्या समकालीन साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे यांना श्री साईबाबांनी नऊ नाणी दिली होती. मात्र ही खरी नऊ नाणी नेमकी कोणाकडे आहेत. हे मोठे गुढ निर्माण झाले असून साई संस्थान कडे दैनिक साई दर्शनचे संपादक जितेश लोकचंदानी यांनी माहिती अधिकारात या संदर्भात माहिती मागवली आहे आजून माहिती उपलब्ध झालेली नाही
साईबाबा संस्थानने याबाबत प्रेस नोट काढून या नाण्यांसंदर्भात संबंधितांकडून खुलासा मागवला आहे. विशेष म्हणजे श्री साईबाबांनी त्यावेळी साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे यांना नऊ नाणी दिली होती. नवभक्तीचे हे नऊ नाणी एक प्रतीक म्हणून देण्यात आले होते. मात्र सध्या या नऊ नाण्यांचे 22 नाणे झाल्याचे संस्थानने प्रेसनोट मध्ये सांगितले आहे.
काहींनी दुसरी नाणी बनवून हेच खरे नऊ नाणी असल्याचे दाखवले जात आहे. काहींनी तर थेट देशातील हैदराबाद व इतर शहरातही ही नऊ नाणी दर्शनाला ठेवून त्याद्वारे दान ,देणगी मिळवण्याचा कार्यक्रम सुरू केल्याचेही संस्थांनच्या प्रेस नोट मधून लक्षात येते. साईबाबांच्या नऊ नाण्यांचा असा आर्थिक कमाई साठी उपयोग करणे कितपत योग्य आहे. या 22 नाण्यांपैकी नऊ नाणे कोणती खरी व खोटी हे तपासणे महत्त्वाचे असून ही सर्व नाणी साई संस्थान कडे जमा करावीत .
साईभक्तांना खरी नाणी शोधून ती येथील संस्थांनच्या संग्रहालयात साईभक्तांच्या दर्शनासाठी व बघण्यासाठी ठेवण्यात यावीत. कोणीही नऊ नाण्यांची खोटी माहिती पसरून साईभक्तांची आर्थिक लूट करू नये .साईभक्तांच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्यांवर व संबंधितांवर कारवाई केली जाईल.
असे साई संस्थांनने म्हटले आहे. साई संस्थांनने साईबाबांनी दिलेली ही नऊ नाणी आमच्याकडे आहे असे म्हणणाऱ्या संबंधित गायकवाड व शिंदे कुटुंबांना ही नाणी संस्थांकडे जमा करावीत खात्री झाल्यानंतर ती परत देण्यात येईल असे सांगितले होते. व तोपर्यंत ही नऊ नाणी कुठेही साईभक्तांच्या दर्शनार्थ नेऊ नये.असे पत्र दिले होते.
मात्र या पत्राच्या अनुषंगाने शिंदे कुटुंबाने संस्थांनच्या पत्रास उत्तर दिले की आम्ही आमच्याकडे असणारी नऊनाणी बाहेर कुठेही घेऊन जात नाही व साई भक्तांची फसवणूक करत नाही .मात्र श्रीमती हिराबाई नाना पाटील शिंदे उर्फ शैलजाताई गायकवाड यांनी संस्थांनच्या त्या पत्राला कोणतेही उत्तर दिले नाही.
उलट संस्थांनच्या पत्रानंतरही शैलजाताई गायकवाड यांनी व त्यांचे चिरंजीव अरुण गायकवाड यांनी हैदराबाद येथे आपल्याकडील असणारी नऊ नाणी साई भक्तांच्या दर्शनासाठी ठेवले होते. हे साई संस्थांनच्या लक्षात आल्याचेही संस्थांनने म्हटले आहे. जर नऊ नाण्यांचे 22 नाणे झाले असेल तर मग खरी नऊनाणी कोणती.? जी खरी नऊ नाणी आहेत ती भक्तांच्या श्रद्धेशी निगडीत आहेत.
मात्र जी इतर नाणी आहेत ती या श्रद्धेच्या भावनेशी खेळणारी ठरत आहेत. त्यामुळे दोन्ही कुटुंबांनी खऱ्या नऊ नाण्यासंदर्भात साई संस्थांनशी चर्चा करावी. ज्यांच्याकडे खरी नऊ नाणी आहेत त्यांनी ती संस्थान कडे द्यावीत.व संस्थान ने ती संस्थांनच्या म्यूझियममध्ये साई भक्तांच्या दर्शनासाठी ठेवावीत.व तसे जाहीर करावे.
इतर बनवलेली नाणी कायमस्वरूपी बंद पेटीत ठेवून द्यावीत. उगाच साई भक्तांच्या श्रद्धेशी या नाण्यांच्या माध्यमातून खेळण्याचा प्रकार करू नये. तसेच गायकवाड कुटुंबा कडून हीच खरे नऊनाणी म्हणत देशातील शहरांमध्ये दर्शन सोहळे आयोजित करून देणगी द्वारे आर्थिक कमाई करण्याचा प्रकार यापुढे बंद व्हावा. संस्थांनने दिलेले पत्र व त्याला उत्तर का दिले गेले नाही याचीही चौकशी व्हावी.
तसेच साई संस्थांननेही या नऊ नाण्यासंदर्भात त्वरित दखल घेऊन ही नऊ खरी नाणी कोणती व खोटी कोणती हे तपासून यापुढे नऊ नाण्यांचे दर्शनसोहळे देशातील इतर ठिकाणी होऊ नये. नऊनाण्यांचे दर्शन सोहळे करायचे असेल तर साई पादुका यांच्याबरोबरच त्यांचे दर्शन सोहळा कार्यक्रम करण्यात यावेत. अशी मागणी साई भक्तांनी केली आहे.