
शिर्डी : भारतीय जनता पार्टीच्या वतीने शिरडी शहरात संघटनात्मक बळकटीसाठी महत्वपूर्ण निर्णय घेत सागर अशोक पवार यांची भारतीय जनता युवा मोर्चा शिरडी शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल शिरडी शहराध्यक्ष रविंद्र पांडुरंग गोंदकर यांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
गोंदकर यांनी आपल्या संदेशात नमूद केले की, पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडताना सागर पवार यांच्यासारख्या खंबीर व सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या कार्यकर्त्याची साथ मिळणे ही संघटनेसाठी मोठी ताकद ठरणार आहे. युवा मोर्चाच्या माध्यमातून शहरातील युवकांना संघटित करून पक्षाची विचारधारा अधिक प्रभावीपणे पोहचविण्याचे काम ते करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तसेच, भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांच्या त्याग व बलिदानातून देश आज प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असून त्यांच्या प्रेरणेने आपण सर्वांनी हे राष्ट्रकार्य पुढे नेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. केंद्र व राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहचवून संघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
सागर पवार यांच्या नियुक्तीमुळे शिरडी शहरातील भाजप संघटनेला नवे बळ मिळणार असून आगामी काळात युवकांच्या सहभागातून पक्षाची ताकद अधिक वाढेल, असामार्गदर्शनाखाली काम करण्याचा निर्धार – सागर पवार
शिर्डी : भारतीय जनता युवा मोर्चा शिरडी शहर अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर सागर अशोक पवार यांनी आपल्या भावना व्यक्त करत मिळालेल्या जबाबदारीचे सोने करण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच पालकमंत्री व राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपण पक्षाचे कार्य प्रामाणिकपणे पुढे नेऊ.
तसेच शिर्डीचे उपनगराध्यक्ष अभय शेळके यांच्या सहकार्याने शहरातील युवकांना एकत्रित करून संघटना अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“पक्षाने दिलेली ही संधी माझ्यासाठी अभिमानाची असून जनतेच्या सेवेसाठी आणि पक्षवृद्धीसाठी मी पूर्ण ताकदीने काम करेन,” असेही त्यांनी यावेळी ठामपणे सांगितले. विश्वास व्यक्त केला जात आहे.
सामाजिक कार्यातून ओळख निर्माण – सागर पवार
शिर्डी : भारतीय जनता युवा मोर्चा शिरडी शहर अध्यक्ष सागर अशोक पवार हे शिर्डीतील कालिका नगर परिसरातील रहिवासी असून सामाजिक कार्यातून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
सागर पवार हे परिसरातील नागरिकांच्या सुख-दुःखात नेहमीच धावून जाणारे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. दिवस असो किंवा रात्र, गरजूंना मदत करण्यासाठी ते सतत तत्पर असतात. त्यांच्या या कार्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल आदराची भावना निर्माण झाली आहे.
कालिका नगर येथे दरवर्षी गणेशोत्सव व नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात आणि भव्य प्रमाणात साजरे करण्यामध्येही त्यांचा पुढाकार असतो. या उत्सवांच्या माध्यमातून सामाजिक एकोपा वाढवण्याचे कार्य ते सातत्याने करत आहेत.
अत्यंत साध्या कुटुंबात जन्मलेले सागर पवार यांनी आपल्या मेहनत, जिद्द आणि सामाजिक बांधिलकीच्या जोरावर आज हे स्थान मिळवले आहे. त्यांच्या या प्रवासामुळे अनेक युवकांसाठी ते प्रेरणास्थान ठरत आहेत.
मान्यवरांच्या उपस्थितीत नियुक्ती सोहळा संपन्न
शिर्डी : भारतीय जनता युवा मोर्चा शिरडी शहर अध्यक्षपदी सागर अशोक पवार यांच्या नियुक्तीप्रसंगी विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली.
या वेळी शिर्डी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा जयश्री ताई थोरात, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, तसेच माजी उपनगराध्यक्ष न्यानु आबा गोंदकर आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी सागर पवार यांना शुभेच्छा देत त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी विश्वास व्यक्त केला. युवकांच्या बळावर संघटना अधिक मजबूत होईल, असा आशावादही यावेळी व्यक्त करण्यात आला.

