Letest News
रामनवमी २०२६ : साईभक्तांच्या पदयात्रेत कीर्तन-प्रवचनांची भक्तीमय मेजवानी #AshokKharat #ShirdiConnection #शिर्डीतून उघड झाला भोंदू साम्राज्याचा काळा खेळ अंधश्रद्धेच्या आडून ल... गुढीपाडवा विशेष : साईनगरीत भक्तीचा महापूर! शिर्डीत आज आणि उद्या दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी शिर्डीत ‘कॅप्टन’ खरातचे जाळे! चाहत्यांपासून कोट्यवधींच्या साम्राज्यापर्यंत – अटकेनंतर खळबळ शिर्डीहून परतणाऱ्या भाविकाला चाकूचा धाक दाखवून लूट-श्रीरामपुरात दोन आरोपी जेरबंद शिर्डीत गॅसचा काळाबाजार? घरगुती सिलेंडरचा हॉटेलमध्ये सर्रास वापर- ९०० रुपयांचा सिलेंडर २ हजारात विक्... साई एम्प्लॉईज सोसायटीचे कार्य ठरले आदर्श-गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिधावाटप कार्यक्रम उत्साहात कृषी क्षेत्र देशाच्या अन्नसुरक्षा व आर्थिक स्थैर्याचा आधारस्तंभ – राज्यपाल जिष्णू देव वर्मा ६०-७० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांची घरे तोडू नयेत-सातबारा देण्याची मागणी शिर्डीत हरवलेले मोबाईल शोधून देण्यात पोलिसांचे कौतुकास्पद काम
क्राईमशिर्डी

अनैतिक संबंध व आर्थिक वादातून सचिन गिधेचा निर्घृण खूनसराईत गुन्हेगार दीपक पोकळे अखेर जेरबंद

राहाता / शिर्डी | प्रतिनिधी – दैनिक साईदर्शन
राहाता–शिर्डी परिसर हादरवून टाकणाऱ्या अपहरण व हत्याकांडाचा अखेर पर्दाफाश झाला असून,
अनैतिक संबंध व आर्थिक व्यवहारातून सचिन कल्याणराव गिधे याचा निर्घृण खून करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.
या प्रकरणातील दहशत निर्माण करणारा सराईत गुन्हेगार दीपक अंबादास पोकळे यास त्याच्या साथीदारासह स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी अटक केली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


☠️ धमकीचा फोन, अपहरण आणि बेपत्ता युवक
दिनांक 10 डिसेंबर 2025 रोजी
सचिन कल्याणराव गिधे (रा. हॉलीडे पार्क शेजारी, शिर्डी) हा साई सुनिता हॉटेल, शिर्डी येथे गेला होता.
त्याच दिवशी आरोपी प्रविण उर्फ पचास वाघमारे याने फिर्यादी श्रद्धा गिधे यांना फोन करून
“सचिन फार माजला आहे, त्याचे हातपाय काढावे लागतील,” अशी जीवघेणी धमकी दिली.
यानंतर सचिन घरी न परतल्याने
दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी राहाता पोलीस ठाण्यात
गु.र. नं. 454/2025 नुसार अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.


🩸 एकाच दिवशी दुसरा अमानुष गुन्हा
त्याच दिवशी आरोपी प्रविण वाघमारे व त्याच्या साथीदारांनी
गौतम कैलास निकाळे (वय 25, रा. राहाता) यास फसवून साकुरी येथे नेले
आणि उपासणे बाबा मंदिराच्या पाठीमागे बेदम मारहाण करून त्याचा पाय फ्रॅक्चर केला.
या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा दाखल आहे.


🚨 पोलीस अधीक्षकांचे आदेश, LCB ची निर्णायक कारवाई
अपहरित सचिन गिधेचा शोध लागत नसल्याने
पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे यांनी
स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे स्पष्ट आदेश दिले.
पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली
विशेष पथक तयार करून सलग 15 दिवस अहोरात्र तपास करण्यात आला.


🕵️‍♂️ पुणे–नाशिक–मुंबईत शोध, संगमनेरमध्ये अटक
रेकॉर्डवरील गुन्हेगार दीपक पोकळे सतत ठिकाणे बदलत असल्याने
पथकाने पुणे, नाशिक, खारघर (मुंबई), छ. संभाजीनगर, मालेगाव येथे तपास केला.
अखेर 06 जानेवारी 2026 रोजी
संगमनेर तालुक्यातील मेंढवण शिवारातील दगडाच्या खाणीत
दीपक पोकळे व त्याचा साथीदार गणेश दरेकर लपून बसल्याची माहिती मिळाली
आणि थरारक कारवाईत दोघांना अटक करण्यात आली.


🔥 कबुलीने धक्कादायक सत्य उघड
सखोल चौकशीत
दीपक पोकळे याने कबुली दिली की,
त्याने प्रविण उर्फ पचास वाघमारे, कृष्णा वाघमारे व गणेश दरेकर यांच्या मदतीने
अनैतिक संबंध व आर्थिक वादातून सचिन गिधेचा खून केला.
खून केल्यानंतर
सचिनचा मृतदेह टायर व डिझेलच्या सहाय्याने जाळून पुरावे नष्ट करण्यात आले.


🚗 स्कॉर्पिओ, मोबाईल जप्त – 15.72 लाखांचा मुद्देमाल
आरोपींकडून
✔️ विनानंबर स्कॉर्पिओ (₹15 लाख)
✔️ 03 मोबाईल फोन (₹72 हजार)
असा एकूण ₹15.72 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
⚠️ 17 गंभीर गुन्ह्यांचा रेकॉर्ड, संपूर्ण परिसरात दहशत
दीपक पोकळे हा
खून, दरोडा, जबरी चोरी, खंडणी, आर्म्स अ‍ॅक्ट व मोक्का
अशा १७ गंभीर गुन्ह्यांचा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून
शिर्डी, राहाता, लोणी, संगमनेर, कोपरगाव परिसरात त्याची दहशत होती.


👮‍♂️ पुढील तपास राहाता पोलीस ठाण्याकडे
ताब्यातील आरोपींना
राहाता पोलीस ठाणे गु.र. नं. 454/2025 मध्ये हजर करण्यात आले असून
पुढील तपास राहाता पोलीस ठाणे करीत आहे.
📢 नागरिकांना आवाहन
आरोपी दीपक पोकळे याने
जर कोणाकडून खंडणी मागितली असेल किंवा इतर तक्रार असेल,
तर नागरिकांनी पुढे येऊन
अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांची उल्लेखनीय कामगिरी
मा. सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली
आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली
पोउपनि. दिपक मेढे,
पोलीस अंमलदार विजय पवार, फुरकान शेख, दिपक घाटकर, राहुल द्वारके, भिमराज खर्से, राहुल डोके, सुनिल मालणकर, सतिष भवर, प्रशांत राठोड, प्रमोद जाधव, महादेव भांड, भगवान धुळे,
तसेच महिला पोलीस अंमलदार सोनल भागवत
यांचे विशेष पथक तयार करून
अपहरित इसमाचा शोध घेण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती.
या पथकाने व्यावसायिक कौशल्य, संयम आणि अथक मेहनतीच्या जोरावर
सलग अनेक दिवस तपास करत
मुख्य आरोपीस जेरबंद करून
या गंभीर गुन्ह्याचा उलगडा केला.
👉 ही कामगिरी म्हणजे खऱ्या अर्थाने कर्तव्यदक्ष पोलिसी सेवेचे जिवंत उदाहरण आहे.


👏 LCB ची उल्लेखनीय कामगिरी
ही संपूर्ण कारवाई
पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली
स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदारांनी पार पाडली.
🗞️ निर्भीड प्रश्न मात्र कायम…
❓ एवढा सराईत गुन्हेगार इतकी वर्षे मोकळा कसा?
❓ स्थानिक पातळीवर याला संरक्षण कोण देत होते?
❓ अशा गुन्हेगारांवर मोक्का असूनही दहशत कशी टिकून राहिली?
👉 या प्रश्नांचा पाठपुरावा दैनिक साईदर्शन करणारच!

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button