Letest News
साईदर्शनासाठी आले अन् चोरटय़ाने कारच फोडली-आयटी इंजिनिअरचा लाखोंचा ऐवज लंपास शिर्डीत कारफोडीची दहशत-स... शिर्डीत किरकोळ वादाचा रक्तरंजित शेवट-भररस्त्यात तरुणाच्या पोटात चाकू खुपसून जीव घेण्याचा प्रयत्न वारंवार तेच आरोपी-तरीही धंदा सुरूच? कल्याणनंतर शिर्डीची पाळी? अवैध देहव्यापाराच्या रॅकेटवर कठोर कारव... रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र निवड समितीवर डॉ. सुरेश हावरे यांची नियुक्ती शिर्डीत शस्त्रतस्करांना पोलिसांचा दणका-स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई अहिल्यानगर जिल्ह्यातील धरणसाठ्यात वाढ-भंडारदरा ४३ टक्क्यांवर निळवंडेतही समाधानकारक पाणीसाठा शिर्डीत 'चिल्लर गँग'चा धुमाकूळ! भाविकांचे मोबाईल-रोकड- पिशव्या लंपास-मध्यरात्री साईनगरीत अल्पवयीन टो... मुसळधार पावसाचा रेड अलर्ट-नदीकाठच्या गावांनी तातडीने सतर्क राहावे! शिर्डीच्या ६ गुन्हेगारांसह ६८ सराईत आरोपी तडीपार श्रीरामपूर विभागाची गुन्हेगारीवर मोठी कारवाई अ‍ॅक्शन मोडमध्ये पोलीस अधीक्षक! गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी 220 सराईत आरोपींचे विशेष समुपदेशन
राजकीयशिर्डी

“शिर्डीत पेट्रोलसाठी झुंबड! पंपांवर लांबच लांब रांगा=नागरिकांना संयम ठेवण्याचे आवाहन”

शिर्डी | प्रतिनिधी
देशभरात निर्माण झालेल्या पेट्रोल-डिझेल तुटवड्याचा फटका आता आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असलेल्या Shirdi शहरालाही बसू लागला आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहरातील बहुतांश पेट्रोल पंपांवर “नो स्टॉक”चे फलक झळकत होते. त्यामुळे स्थानिक नागरिक, व्यावसायिक, साईभक्त आणि शेतकरी यांच्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.
शिर्डीत हॉटेल व्यवसाय, पर्यटन, प्रवासी वाहतूक आणि शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर इंधनाची गरज भासत असते. त्यातच वीज खंडित झाल्यानंतर जनरेटरसाठी डिझेलची मागणी वाढल्याने उपलब्ध साठा काही तासांतच संपत असल्याचे चित्र दिसून आले. परिणामी अनेक वाहनधारकांना रिकाम्या हाताने परत जावे लागत होते.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


मात्र आज सकाळी शहरात पेट्रोल आणि डिझेलचा नवीन टँकर दाखल झाल्यानंतर नागरिकांनी पेट्रोल पंपांवर एकच गर्दी केली. इंधन आल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरताच दुचाकी, चारचाकी, टेम्पो, ट्रॅव्हलर, डंपर आणि अगदी जेसीबी मशिन्सही डिझेल भरण्यासाठी रांगेत उभ्या राहिलेल्या दिसून आल्या. काही नागरिकांनी ड्रम आणि कॅन घेऊनही इंधन साठवण्याचा प्रयत्न केला.गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासनाने आणि पेट्रोल पंप चालकांनी मर्यादित इंधन वितरणाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सध्या प्रत्येक वाहनाला ५०० रुपयांचे पेट्रोल आणि २००० रुपयांचे डिझेल दिले जात आहे. “सर्वांना इंधन मिळावे यासाठीच ही मर्यादा ठेवण्यात आली आहे. नागरिकांनी घाबरून जास्त साठा करू नये आणि अफवांवर विश्वास ठेवू नये,” असे आवाहन पंप चालकांकडून करण्यात आले.


युद्धजन्य परिस्थिती आणि देशव्यापी पुरवठा अडचणींमुळे हा तुटवडा निर्माण झाल्याचे सांगितले जात असून, पुढील दोन-तीन दिवसांत परिस्थिती सुरळीत होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. दरम्यान, शिर्डीतील नागरिकांनी शांतता व संयम राखून प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज व्यक्त होत आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button