
शिर्डीत सुरु असलेल्या बेकायदेशीर व रोडलगत असलेल्या मटण दुकाने बंद करण्यासाठी प्रसादनगर, विठ्ठलवाडी, गणेशवाडी, गोविंदनगर, गोवर्धन नगर, श्रीकृष्ण नगर, विजयानगर, रामनगर ओंकारनगर येथील सर्व रहिवाशी यांनी शिर्डी नगर परिषद कडे तक्रार अर्ज दिला आहे तशेच विविध नगरातील रहिवाशी यांनी द्वारका सर्कल ते करडोबा मंदिरापर्यंत स्पिडब्रेकर बसविणेबाबत सदर परिसरात चार श्री महादेव मंदिरे, गणपती मंदिर, देवीची मंदिरे
व श्री साईबाबांना येणारी पदयात्री पालखी थांबे आहेत. सदर मटणाच्यां दुकानांमधुन जे शिळे मटन व सदर प्राणी कापल्यानंतर त्याची मांसाहरी उष्टावळ, मांस, दुकानांच्या जवळपास टाकले जाते. ते खाण्यासाठी परिसरातील लांबुन मांसाहारी हिंस्त्र कुत्र्यांच्या टोळ्या येतात मांस खावुन झाल्यानंतर परिसरातील मुख्य रस्ता व अंतर्गत रस्त्यांवर विविध ठिकाणी बसतात. ब-याच स्थानिक नागरिकांना सदर मांसाहारी हिंस्त्र कुत्र्यांच्या टोळ्यांनी चावा घेतलेला आहे.
जर अशा टोळीने रिंगन करुन मध्ये उभे असलेल्या लहान मुलावर हल्ला केला तर लहान मुल काही प्रतिकार करु शकत नाही, मांसाहारी हिंस्त्र कुत्र्यांची टोळी अनुचित प्रकार करु शकते. या संभाव्य धोका लक्षात घेता मटणाची दुकाने काढली तर सदर परिसरातील मांसाहारी हिंस्त्र कुत्र्यांच्या टोळ्या निघुन जातील.
सदर मटणांच्या दुकांनामुळे त्यांनी फेकलेल्या मांसाहारी उष्टावळी, रक्त, दुर्गर्चित पाण्यामुळे परिसरात माश्यांचे, डासांचे प्रमाण खुप वाढले आहे. पर्यायाने डेंगु, मलेरिया, थंडीतापाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. वरील विषयाचे गांभिर्य लक्षात घेवून मटणाची दुकाने बंद करण्याची व स्पिड ब्रेकर बसविण्याची मागणी अर्जाद्वारे करण्यात आलेली आहे
वास्तविक पाहाता शिर्डी मध्ये कालिका नगर बाजारतळ येथे भव्य मटण मार्केट असतांना त्याठिकाणी मटन चिकन विकणाऱ्यांना परवानगी दिली पाहिजे तसा अर्ज देखील दैनिक साईदर्शनाने २ वर्षांपूर्वी होता कि शिर्डी शहरात उपनगरामधील मतं चिकनचे दुकाने बंद करून त्यांना मटण मार्केट येथेच परवानगी द्यावी परंतु आपल्या शिर्डीचे अति कर्तव्यदक्ष अधिकारींनी त्याकडे दुर्लक्ष केलं होते