Letest News
मोठी राजकीय खळबळ! रुपाली चाकणकर यांचा राजीनामा-खरात प्रकरणाचा मोठा परिणाम शिर्डीत ‘4 एकर’चा स्फोटक घोटाळा-गहाण जमीन थेट विक्रीत-कोट्यवधींचा खेळ उघड! शिर्डीत श्री रामनवमी उत्सवाची भक्तीमय सांगता-दहिहंडी फोडत उत्सवाचा समारोप २ लाखांची लाच घेताना शिर्डीचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी रंगेहात- पुणे महसूल विभाग हादरला भोंदू बाबाशी नाव जोडल्याने केसरकर संतापले ‘राजकीय कट’ असल्याचा थेट आरोप!” “ओळख मान्य पण संबंध नाकारल... शिर्डी गॅस टंचाईप्रकरणी पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन 24 तासांचा अल्टिमेटम समीर वीर आक्रमक शिर्डीत भव्य नेत्र तपासणी शिबिर- १५० रुग्णांना दिलासा मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत शिर्डीत ‘भोंदू बाबाचा’ काळा साम्राज्य उघड! श्रद्धा अश्लील व्हिडिओ-खंडणी आणि बलात्काराचा थरारक गुन्हे... महिलांचे नाव उघड करू नये-कोपरगावात गुन्हा दाखल पोलिसांचे आवाहन: पिडीतांची ओळख जाहीर केल्यास कठोर कार... अहिल्यानगरमध्ये सुट्या पेट्रोल-डिझेल विक्रीवर बंदी जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश
अ.नगरराजकीय

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी 13 ऑक्टोबरला आरक्षण सोडत

प्रतिनिधी

sai nirman
जाहिरात

🔹 13 ऑक्टोबरला आरक्षण सोडत काढणार

राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकांसाठी आरक्षण सोडतीची तारीख जाहीर झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, 13 ऑक्टोबर 2025 रोजी आरक्षण सोडत काढली जाणार आहे. या प्रक्रियेत राज्यातील एकूण 32 जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गत 336 पंचायत समित्यांच्या सदस्यपदासाठी आरक्षण निश्चित केले जाणार आहे.

DN SPORTS

kamlakar

🔹 प्रारुप मतदार यादी 8 ऑक्टोबरला

जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांव्यतिरिक्त नगरपरिषद व नगरपंचायतींसाठीचीही प्रक्रिया सुरू आहे. 8 ऑक्टोबर 2025 रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध होणार असून, त्यानंतर मतदारांना आपली नावे, दुरुस्ती किंवा आक्षेप नोंदविण्याची संधी मिळणार आहे.

🔹 जिल्हाधिकारी कडून सूचना 10 ऑक्टोबरला

संबंधित जिल्हाधिकारी 10 ऑक्टोबर 2025 रोजी वृत्तपत्रांत आरक्षण सोडतीसंदर्भातील अधिकृत सूचना जाहीर करतील. त्यानंतर 13 ऑक्टोबरला सोडत काढली जाईल व प्रारूप आरक्षणाची अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल.

🔹 अंतिम आरक्षण 3 नोव्हेंबरला

सोडतीनंतर 14 ते 17 ऑक्टोबर 2025 या कालावधीत नागरिक व संबंधित पक्षांना हरकती व सूचना नोंदविण्याची संधी असेल. प्राप्त हरकतींचा विचार करून, 3 नोव्हेंबर 2025 रोजी अंतिम आरक्षण शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यानंतर निवडणुकांची पुढील प्रक्रिया सुरू होईल.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button