Letest News
पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपट टीमचे श्री साईबाबा समाधी दर्शन शिवमहापुराण कथा –पोलिसांचे नियोजन फळास गर्दीचा फायदा घेणाऱ्या टोळ्यांवर धडक कारवाई-२६ आरोपींना अटक मिश्राला साईबाबांची एलर्जी महाराष्ट्र हि साईंची शिवांची आणि संतांची भूमी साईबाबा हे आमचे देवचं नाहीत... रेखा जरे हत्याकांडात मोठी घटना! — बाळबोठे यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर कोपरगाव – करंजी शाळेत दाखले वाटप; नायब तहसीलदार सातपुते यांच्या उपस्थितीत उपक्रमाची प्रशंसा साईभक्त जितेंद्र उमेडी यांनी श्री साईबाबांच्या चरणी तांब्याची छत्री केली अर्पण आजचा दिवस शिर्डीकरांसह संपूर्ण साईभक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि भावनिक —श्री साईबाबा महासमाधी दिन गुन्हे प्रतिबंध आणि पुढील योजना-ऑपरेशन मुस्कान – पार्ट 2 : शालेय विद्यार्थ्यांमध्ये जागृती अभियान निवडणूक आयोग हरिश्चंद्र नाही' उद्धव संतापले -मतदार यादी दुरुस्त करा- नंतरच निवडणुका राज ठाकरे-मतदार ... शिवसेनेच्या (ठाकरे गट) नवीन जिल्हा कार्यकारिणीने संगमनेर तालुक्यात उत्साहाचा नवा संचार
अ.नगरराजकीय

हा सरकारचा पैसा असून कुणाच्या बापाचा पैसा नाही फडणवीस

खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेवरुन विरोधकांचा ‘बाप’ काढला लाडकी बहीण योजना बंद पडावी यासाठी काँग्रेसवाल्यांनी कोर्टात धाव घेतली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर महायुतीच्या ‘लाडकी बहीण योजने’सह सर्व योजना रद्द करण्याची भाषा आदित्य ठाकरेंनी केली. तर ही लाचखोर योजना असल्याचं काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या होत्या. मात्र, हा सरकारचा पैसा असून कुणाच्या बापाचा पैसा नाही.

kamlakar

त्यामुळं लाचखोर म्हणण्याचा अधिकार नाही शिर्डी औद्योगिक वसाहत, शिर्डी थीम पार्क आणि पशुवैद्यकीय महाविद्यालयासह जिल्ह्यातील अन्य विकासात्मक कामाचा भूमिपूजन समारंभ पार पडला.

तसंच ‘लाडकी बहीण योजने’च्या यशस्वी अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर महिला सशक्तीकरण मेळाव्याचं आयोजन शिर्डीत करण्यात आलं. ‘लाडकी बहीण योजना’ वाढीव पद्धतीने सुरुच ठेवणार असल्याची ग्वाही फडणवीस यांनी दिली.शिर्डी, दि.२७ – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील १ कोटी ९० लाख बहीणींच्या बॅंक खात्यात योजनेचा लाभ देण्यात आला आहेत.

उर्वरित ६० लाख महिलांना लवकरच लाभ दिला जाईल. एकाही भगिनींला दिवाळीत भाऊबीजेच्या ओवाळणीपासून वंचित ठेवले जाणार नाही, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

शिर्डी येथे आयोजित मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत महिला महामेळाव्याप्रसंगी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. कार्यक्रमाला महसूल, पशूसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकासमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील,  आमदार मोनिका राजळे, आमदार आशुतोष काळे,

 माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, सदाशिव लोखंडे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालीनीताई विखे पाटील,  विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, श्री.साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, महिला विकासाच्या योजना केल्याशिवाय विकसित भारताचे स्वप्न साकार होणार नाही. त्यादृष्टीने केंद्र शासनाने लाडली बहीण, लखपती दीदी योजना आणली. राज्यातील १ कोटी महिलांना लखपती दिदी करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या  नेतृत्वाखाली राज्यात लेक लाडकी योजना आणण्यात आली. यात मुलींना वयाची १८‌ वर्ष पूर्ण झाल्यावर एक लाख रूपये मिळणार आहेत.

  महिलांना एसटी बसमध्ये पन्नास टक्के तिकिट सवलत देण्यात आली‌. यामुळे तोट्यात आलेली एसटी फायद्यात आली. शासन महिला सक्षमीकरणासाठी संवेदनशीलपणे काम करित आहे.

मुलींच्या शिक्षणासाठी ५०६ महत्त्वाच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी आता संपूर्ण शुल्क माफ करण्यात आले आहे. त्यामुळे आता मुलींना शिकविले पाहिजे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून महिलांना वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत देण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

श्री.फडणवीस पुढे म्हणाले, रात्रंदिवस  काबाडकष्ट करणाऱ्या लाडकी बहीणींना  दिलेल्या महिलांसाठी योजनेतून मिळालेली रक्कम मोलाची आहे. यापुढे ही योजना कायमस्वरूपी सुरू राहील‌. या योजनेच्या मासिक लाभात ही वेळोवेळी वाढ करण्यात येईल, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी भगिनींना आश्वस्त केले.

राज्य शासन विविध कल्याणकारी योजना राबवित असल्याचे नमूद करून ते म्हणाले, शेतकऱ्यांना वर्षभर वीज देण्यासाठी शासन काम करीत आहे. शेतकऱ्यांच्या एक रूपयात पीक विमा योजनेच्या माध्यमातून ८ हजार कोटींचा विमा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांना हमीभाव देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे.

पन्नास वर्षापासून प्रलंबित निळवंडे प्रकल्पास शासनाने चालना दिली आहे. पश्चिम वाहिनींचे ५५ टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात आणून अहमदनगर, नाशिकसह संपूर्ण मराठवाडा पूर्णपणे दुष्काळमुक्त करण्याचे काम शासन करणार आहे, असेही उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यावेळी सांगितले.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा

पैशांचा उपयोग घरकामांच्या खर्चासाठी करून घेतला, अशी भावना श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव येथील भाग्यश्री कुलांगे यांनी दिली‌. लाडकी बहीण योजनेच्या मिळालेल्या पैशांतून मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करता येईल अशी प्रतिक्रिया राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथील मंगला तेलोरे यांनी दिली.

लाडकी बहीण योजनेच्या पैशांतून घरगुती पशुउद्योग सुरू करणार असल्याची प्रतिक्रिया राहुरी तालुक्यातील खंडाबे येथील लाभार्थी महिला सुनिता बबन महानोर यांनी दिली‌.

ढोल ताशांचा गजर, लेझीम पथके, महिलांच्या मनोरंजनासाठी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम आणि संगीताचे सूर असे घरगुती समारंभाचे स्वरुप  अनुभवतांना महिलांना झालेला आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता. शासनाने सांगितल्याप्रमाणे रक्षाबंधनपूर्वी योजनेत रक्कम जमा झाल्याने शासनाविषयी विश्वासाची भावनाही कार्यक्रमात दिसून आली. आताप्रमाणे दर महिन्यात रक्कम जमा होईल याची खात्री आहे, अशा प्रतिक्रिया महिलांनी दिल्या.

राज्यातील महिलांचे आर्थिक स्वावलंबन, आत्मनिर्भर करणे, महिलांचे आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे थेट महिलांच्या बँक खात्यात रक्कम जमा झाल्याने  कुटुंबातील आमची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी शासनाने महिलांना दिलेला आधार खूप मोलाचा आहे. लाडक्या बहिणींना हक्काचा आधार दिला असल्याच्या प्रतिक्रियाही महिलांनी दिल्या.

दर महिन्याला हक्काचे पैसे मिळणार असल्याने आमच्या संसाराला आधार झाल्याचे संगमनेर तालुक्यातील मेंढवण  येथून आलेल्या सुंदराबाई वसंत भोसले यांनी सांगितले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत अशा अनेक चांगल्या प्रतिक्रिया कार्यक्रमाला आलेल्या महिलांनी व्यक्त केल्या. शासनाची ही भेट त्यांच्यासाठी अमूल्य असल्याचे दिसून आले आणि त्यामुळेच शासनाला त्यांनी धन्यवादही दिले.

शिर्डी संस्थानामधीन ५८४ कर्मचाऱ्यांना कायम करण्यात आले. शिर्डी नवीन विमानतळांच्या टर्मिनल इमारतीचे लवकरच भूमिपूजन करण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button