राहाता (प्रतिनिधी) — राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या हंगामातील एकाधिकार सोयाबीन खरेदीसाठी नांव नोंदणीला प्रारंभ झाला असून, परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी ही संधी साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या संदर्भात माहिती देताना विजय कातोरे यांनी सांगितले की, सोयाबीन खरेदीसाठी पात्र ठरण्यासाठी शेतकऱ्यांनी आपली नोंदणी बाजार समिती कार्यालयात प्रत्यक्ष येऊन करणे आवश्यक आहे. कोणतीही अपूर्ण माहिती अथवा कागदपत्रांची कमतरता असल्यास नोंदणी अपूर्ण राहणार असल्याने शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
नोंदणी करताना शेतकऱ्यांनी खालील कागदपत्रे सादर करावीत —
1️⃣ ७/१२ उतारा व ई-पिक नोंदीची प्रत
2️⃣ आधार कार्ड झेरॉक्स
3️⃣ बँक पासबुक झेरॉक्स
ही सर्व कागदपत्रे घेऊन शेतकऱ्यांनी राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात समक्ष उपस्थित राहून नांव नोंदणी करावी, अशी विनंती विजय कातोरे यांनी केली आहे.
शेतकऱ्यांच्या सोयीसाठी कार्यालयीन वेळेत संबंधित कर्मचारी मार्गदर्शन करत आहेत. सोयाबीन उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांनी नोंदणी करून आपला हक्काचा लाभ घ्यावा, असेही कातोरे यांनी शेवटी सांगितले.
