
शिर्डी (प्रतिनिधी ) शिर्डीत येऊन साईदर्शन झाले.त्यामुळे मोठे समाधान वाटले. असे मत स्वयंसेवक संघाचे सर्व संघ चालक मोहन भागवत यांनी शिर्डीत व्यक्त केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक श्री.मोहन भागवत यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. साईदर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे व जनसंपर्क अधिकारी दिपक लोखंडे आदी उपस्थित होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक श्री.मोहन भागवत यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर शेरेबुकात खालीलप्रमाणे अभिप्राय नोंदवला. त्यांनी शेरेबुकात लिहीले आहे की,
1857 च्या स्वातंत्र्य युद्धानंतर भारताच्या नवोत्थानाचा पाया या नात्याने भारतभर समाजाचे प्रबोधन – अध्यात्म तत्त्व आणि व्यवहार या मूलभूत घटकाचे ज्या ईश्वरीय योजनेने झाले त्याचा एक भाग म्हणजे शिर्डीचे साईबाबा होत,
देह त्यागानंतरही त्यांची तपस्या अनेकांना वरील दृष्टीने पथदर्शक ठरते ही प्रचिती आहे अशा श्री बाबांच्या समाधी मंदिराचा नित्य कार्ये विकास व त्याचे नित्य उत्तम व्यवस्थापन करणाऱ्या सर्व कार्यकर्ता मंडळींचे मनापासून कृतज्ञतापूर्वक धन्यवाद. असे लिहीले आहे.