Letest News
साईनगरीत रामनवमीचा जल्लोष- लाखोंच्या गर्दीतही शिस्तीचा विक्रम!भक्तीचा महासागर शिर्डीत उसळला-प्रशासना... शिर्डीत भाविकांना लक्ष्य- मंदिरातच दागिन्यांवर डल्ला – 1.25 लाखांचा ऐवज लंपास 🔥 शिर्डीत रेशन घोटाळा उघड-दुकानदाराची दादागिरी शिगेला- नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत! 78 लाखांचा कापड घोटाळा उघड-अहिल्यानगर पोलिसांची राजस्थानपर्यंत धडक कारवाई AI फोटोचा धक्कादायक प्रकार-AK-47 दाखवत इंस्टाग्रामवर दहशत पसरवण्याचा प्रयत्न-दोघांवर गुन्हा! लिंगपिसाट खरात भोंदूबाबाच्या देवस्थानाला कोट्यवधींचा निधी-प्रस्तावच गायब?  ईशानेश्वर देवस्थान प्रकरण... “घरावरचा बुलडोझर थांबला!” – शिर्डीत गरीबांना मोठा दिलासा-फडणवीस सरकारचा ऐतिहासिक निर्णय-“फडणवीसांच्य... शिर्डी सह राहता तालुक्यात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस-नागरिकांची धांदल उडाली साईनामाशी नातं असलेली ज्येष्ठ व्यक्ती हरपली-आशालता ताई नागरे यांच्या निधनाने शिर्डीत शोककळा रामनवमी उत्सवात ‘रिल’चा स्फोट शिर्डीची बदनामी करणाऱ्यावर गुन्हा
शिर्डी

अनेक हॉटेल, रेस्टॉरंट मध्ये मोफत साधे ,स्वच्छ पाणी देण्याऐवजी बाटलीबंद पाण्याची अप्रत्यक्षपणे केली जाते सक्ती!

शिर्डी (प्रतिनिधी)
सध्या बाटलीबंद पाण्याचा जमाना आल्याचे सर्वत्र दिसून येत आहे.इतर शहराप्रमाणे शिर्डीतही काही हॉटेल, रेस्टॉरंट मध्ये गेल्यावर आपल्यासमोर बाटलीबंद पाणी दिले जाते. खरं तर टेबलवर एक साधं व स्वच्छ पाणी जग आणि ग्लास अशी सोय करणे आवश्यक आहे. तसा नियम आहे. परंतु अधिक पैसे मिळवण्यासाठी विनाकारण बाटली बंद पाणी घेण्याची शक्ती जणू अप्रत्यक्षपणे अश्या हॉटेलमध्ये केली जात असल्याचे चित्र अनेक ठिकाणी ‌येथे पाहायला मिळते. प्रत्येक हॉटेलमध्ये, रेस्टॉरंटमध्ये प्यायचं साधं पाणी ग्राहकांना देणे बंधनकारक आहे आणि ते दिले नाही तर त्या विरोधात अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करता येते.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

असे असतानाही अनेक हॉटेल रेस्टॉरंट मध्ये साधे पाणी न देता बाटलीबंद पाणी टेबलवर ठेवून ते अप्रत्यक्षपणे ग्राहकांना खरेदी करण्याची जणू सक्तीच होत असल्याचे चित्र दिसत असून त्यावर औषध प्रशासन कारवाई करणार का? असा संवाल करत आठवड्यातून एकदा तरी अन्न व औषध प्रशासनाने येथे पथके पाठवून अशा हॉटेलवर छापे टाकावेत व ग्राहकांना बाटलीबंद पाणी विक्री करून होणारी लूट थांबवावी. अशी मागणी शिर्डी नगरपरिषदेचे नगरसेवक सुरेश काळू आरणे यांनी केली आहे.

kamlakar


सुरेश आरणे यांनी म्हटले आहे की, बाटलीबंद पाणी खरेदी केले तर पैसे जातात तसेच पाणी पिल्यानंतरही ही रिकामी बाटली कचरा ठरते. या रिकाम्या बाटली मुळे प्रदूषण वाढते. पुण्यामध्ये अशी सक्ती हॉटेल रेस्टॉरंट मध्ये होऊ नये म्हणून गोखले इन्स्टिट्यूट मधील सेंटर ऑफ सस्टेनेबल या सेंटरकडून मोहीम सुरू करण्यात आली आहे. प्लास्टिक ची बाटली करताना रासायनिक पदार्थ वापरले जातात. त्याचे लिंचिंग होते. प्लास्टिकचे केवळ दोन ते तीन वेळा रिसायकलिंग होते. नंतर ते इतके कमकुवत होते की त्याचे काहीच करता येत नाही. ते कचरा म्हणून पर्यावरणात राहते. त्याचे विघटन होत नाही. पण तुकडे होत राहतात .ते सगळीकडे माती नदी समुद्र यातून आपल्या अन्नसाखळीत प्रवेश करतात. त्यामुळे हा सर्व प्रकार बंद व्हावा म्हणून साधे व स्वच्छ पाणी हॉटेल रेस्टॉरंट मधून जग मधून देणे महत्त्वाचे आहे. आता अनेक ठिकाणी बस स्टॅन्ड, रेल्वे स्टेशन सार्वजनिक ठिकाणी स्वच्छ पाणी मोफत मिळते.

मग त्याचप्रमाणे हॉटेल रेस्टॉरंट मधून ते मिळावे. तसा अन्न औषध प्रशासनाचा नियम आहे .मात्र हा नियम डावलून पैशासाठी बाटलीबंद पाणी जाणीवपूर्वक विक्रीसाठी ठेवले जाते. ग्राहक हॉटेलमध्ये आल्यानंतर बाहेर जात नाही. त्यामुळे प्रत्येक हॉटेल रेस्टॉरंट मध्ये येथे स्वच्छ मोफत पिण्याचे पाणी सुद्धा मिळेल असा फलक लावावा. जर असे नसेल तर अशा हॉटेल रेस्टॉरंट वर कारवाई व्हावी अशी मागणी सुरेश काळू आरणे यांनी केली आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button