
अहिल्यानगर –
अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपुर शहरात अवैधरित्या नशेचे इंजेक्शन व बॉटल्या विकणाऱ्या औषध विक्रेत्यावर स्थानिक गुन्हे शाखेने धाड टाकत तब्बल ₹31,370 किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध नशेच्या रॅकेटचे थरकाप उडाले आहेत.
ही धाड मा. श्री सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांच्या आदेशानुसार आणि पो.नि. किरणकुमार कबाडी, स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
🚨 कारवाईचा थरार:
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील
पोउपनि दिपक मेढे, पोलीस अंमलदार विजय पवार, राहुल द्वारके, रिचर्ड गायकवाड, सुनिल मालणकर, रमीझराज आतार, चंद्रकांत कुसळकर पो.का जालिंदर माने,पोका मांडगे
पो.हेका खैरे,पोका मालणकर
पोका जाधव पोका खेडकर चालक भगवान धुळे चालक कुसळकर या कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.
गुप्त माहितीच्या आधारे पथकाने औषध निरीक्षक सोमनाथ मुळे यांना बोलावून घेतले व एक डमी ग्राहक तयार करून “शिव मेडिकल, खंडाळा शिवार” येथे सापळा रचला.
डमी ग्राहकास दुकानातील मालकाने नशेची बॉटल विकल्याने तत्काळ पथकाने छापा टाकून पंकज राजकुमार चव्हाण (वय 21, रा. खंडाळा) यास ताब्यात घेतले. त्याच्या दुकानातून व घरातून ₹31,370 किमतीचा नशेच्या इंजेक्शनचा साठा व रोख रक्कम जप्त करण्यात आली.
या प्रकरणी पोको/203 रमीझराजा रफीक आतार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीरामपुर शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. 914/2025, भा.दं.सं. 2023 चे कलम 123, 125, 278 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास श्रीरामपुर शहर पोलीस करीत आहेत.
🏆 शिर्डीतही नशेच्या इंजेक्शनचे जाळे? नागरिकांची मागणी – शिर्डीतही अशीच धडक कारवाई व्हावी!
दरम्यान, या प्रकरणाचे धागेदोरे शिर्डी परिसराशी जोडलेले असावेत, अशी चर्चा रंगली आहे. शिर्डी शहरातही काही ठिकाणी नशेकरिता वापरल्या जाणाऱ्या इंजेक्शनची अवैध विक्री होत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जशी श्रीरामपुरात तात्काळ कारवाई केली, तशीच धडक मोहीम शिर्डीत राबवून सर्व मेडिकल तपासावीत आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.