संकेत अनिल सापते वय. 20 वर्षे, धंदा-शिक्षण रा. सापतेवस्ती अस्तगाव ता राहाता जि अहिल्यानगर नवनाथ नगर, राहाता ते अस्तगाव जाणारे रोङने सुनिल भाउसाहेब नळे रा अस्तगाव यांचे वस्तीजवळ समोरुन अस्तगाव कडुन प्लसर व फोरएकेस मोटार सायकलवर आलेले 1) गणेश बिलास कोळगे रा विशालनगर, राहाता 2) यश प्रदीप मोरे रा दहेगाव ता राहाता 3) ओमकार उर्फ भैय्या शैलेश रोहम रा रांजणगाव रोङ, राहाता
4) प्रशांत जनार्धन जाधव रा राहाता या सर्वानी मिळून मला रस्त्यात मोटार सायकल आङवी लावुन चाकुचा धाक दाखवुन वरील वर्णनाचा मोबाईल व पैसे बळजबरीने चोरुन घेतले बाबत राहाता पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 220/2025 भारतीय न्याय संहिता कलम- 309(4), 3(5) प्रमाणे दाखल करण्यात आला होता.
अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर श्री. वैभव कलुबर्म तसेच शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. शिरीष वमने यांनी वरील गुन्ह्याचा आढावा घेवून गुन्हे उघडकीस आणणेसाठी सुचना दिल्या होत्या. त्यावरून पोलीस निरीक्षक श्री. नितीन चव्हाण यांनी सदर गुन्हयातील फिर्यादी यांनी आरोपींचे दिलेले वर्णनावरून गोपनीय माहिती घेवून सदरचे गुन्हेगार हे राहाता परिसरात असल्याची खात्रीशीर माहिती गोपणीय बातमीदाराकडुन मिळाल्याने
त्यावरून राहाता पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे, पोलीस उपनिरीक्षक किरण साळुंके, मपोसई कोमल कुमावत, पोहेका जी.के. गडाख, पोकों / ए. आर गवांदे, मपोना/2332 रुपाली राजगिरे असे राहाता परिसरात चितळी रोड येथे पाळत ठेवून सराईत गुन्हेगार नामे 1) गणेश विलास कोळगे वय 25 वर्षे, रा. गौतमनगर ता. राहाता जि. अहिल्यानगर
यास शिताफिने ताब्यात घेवून सदर आरोपीस विश्वासात घेवुन चौकशी केली असता त्याने त्याचे साथीदार 2) यश प्रदीप मोरे वय 21 वर्षे, रा दहेगाव ता. राहाता जिल्हा अहिल्यानगर 3) ओमकार उर्फ भैय्या शैलेश रोहम रा रांजणगाव रोङ, राहाता 4) प्रशांत जनार्धन जाधव रा. राहाता यांचेसह गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.
यातील ताब्यात घेतलेला आरोपी 1) गणेश विलास कोळगे यास वरील गुन्ह्यात अटक करण्यात आली असून त्यास मा. न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने दिनांक 24/05/2025 रोजी पावेतो पोलीस कस्टडी मंजुर केली आहे. सदर आरोपी याचेकडेस गुन्ह्यात चोरलेल्या मुद्देमाला बाबत व गुन्ह्यात वापरलेल्या मोटार सायकली बाबत विचारपुस करुन पुढील तपास क//रीत आहोत.
सदर आरोपीचे साथीदार यांचे नावे निष्पन्न करण्यात आले असुन पोलीस पथक कसोशिने शोध घेत असून सदर आरोपीतांकडून अश्या प्रकारे जबरी चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. तसेच एम.आय.डी.सी पोलीस स्टेशन सिन्नर जिल्हा नाशिक येथील गु.र.न 120/2025 भा. न्या संहिता कलम 103(1), 140(1),238,3(5) यामध्ये आरोपी नामे गणेश विलास कोळगे हा पाहीजे असलेला आरोपी असल्याची माहीती संबंधीत पोलीस स्टेशन येथुन प्राप्त झाली आहे.
अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर श्री. वैभव कलुबर्मे तसेच शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. शिरीष बमने यांनी गुन्हे उघडकीस आणण्यासाठी केलेले मार्गदर्शन व सुचनां प्रमाणे राहाता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण सोबत पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे,
पोलीस उपनिरीक्षक किरण साळुंके, मपोसई कोमल कुमावत, पोहेकाँ जी. के. गडाख, पोकों / ए. आर गवांदे मपोना/2332 रुपाली राजगिरे व पोहेकाँ/58 सचिन धानड (अपर पोलीस अधिक्षक कार्यालय श्रीरामपुर) असे पथकाने वरील जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणुन कामगिरी केली आहे.