Letest News
‘विखेंनी साईबाबांच्या चरणी हात ठेवून सांगावे!’ – नगर–मनमाड रस्त्यावर निलेश लंके यांचा थेट हल्ला साईबाबांच्या दर्शनाला आलेल्या भाविकांवर डल्ला! शिर्डीत चैनस्नॅचिंग करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद-स्थ... १५० रुपयांच्या तंबाखूवर धाडसी कारवाई, पण शिर्डी राहात्यात कोट्यवधींच्या गुटखा तस्करीला अभय! शिर्डीत दलालगिरीला लगाम! भाविकांची अडवणूक करणाऱ्यांवर कलम १५२ चा चाबूक बंद दरवाजामागचं गूढ उघडलं- शिर्डीत हॉटेल कामगाराचा गळफास-कारण अद्याप गुलदस्त्यात झिरो टॉलरन्सचा बडगा! शिर्डीतील २ गुन्हेगारांसह ३२ सराईत आरोपींवर तडीपार प्रस्ताव नियम पाळा-नाहीतर कारवाई! शिर्डीत रिक्षाचालकांना पोलीस निरीक्षक महेश येसेकरांचा इशारा दुःखातून सेवेकडे… साईबाबा संस्थानच्या आवाहनाला प्रतिसाद-नेत्रदानातून अनेकांना नवी दृष्टी शिर्डी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी-देशभरातील ७ राज्यांत शोधमोहीम-हरवलेले ५० महागडे मोबाइल शोधून मूळ ... श्रद्धेचे सुवर्ण अर्पण-येथील साईभक्त आरती बिहानी यांचे ११.९९ लाखांचे सोन्याचे ब्रोच श्री साईचरणी अर्...
क्राईमशिर्डी

श्री साईबाबांबद्दल चुकीच्या अफ़वा व आर्थिक फसवणूकी सह विविध विषयांवर धोरण व यंत्रणा राबवावी

शिर्डी प्रतिनिधी
श्री साईबाबा संस्थान व श्री साईबाबांबद्दल होणाऱ्या चुकीच्या अफवा, आर्थिक फसवणूक व दिशाभूल करणाऱ्या कृत्यांवर प्रतिबंध करण्यासाठी अधिकृत धोरण व यंत्रणा राबविण्याबाबत आज श्री साईबाबा संस्थांनला अर्ज देण्यात आलेले आहे त्यात ग्रामस्थ्यांच्या वतीने कमलाकर कोते म्हटले आहे कि

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


अलीकडील काळात समाजमाध्यमांवर व विविध माध्यमांतून श्री साईबाबा संस्थान व श्री साईबाबांबाबत अपुऱ्या माहितीतून व गैरसमजातून चुकीच्या अफवा पसरवल्या जात आहेत. तसेच काही व्यक्ती किंवा गटांकडून –

  1. श्री साईबाबांच्या वस्तू आपल्याकडे असल्याचा खोटा दावा करून भक्तांची दिशाभूल व आर्थिक देणगी गोळा करणे.
  2. विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याच्या नावाखाली भक्तांकडून पैसे मागणे.
  3. फेक सोशल मीडिया अकाउंट तयार करून ऑनलाईन रूम बुकिंग, दर्शन पास किंवा अन्य सेवा उपलब्ध असल्याचे दाखवून भक्तांची फसवणूक करणे.

वरील प्रकारांमुळे श्री साईबाबा संस्थानची प्रतिमा व भक्तांचा विश्वास दोन्ही बाधित होत असून अनेक निरपराध भक्तांचे आर्थिक नुकसान होत आहे.

त्यामुळे, भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी व दोषींवर तात्काळ कारवाई करण्यासाठी श्री साईबाबा संस्थानने खालील उपाययोजना राबवाव्यात,

  1. अधिकृत धोरण – अशा अफवा, खोटे दावे व फसवणुकीबाबत संस्थेचे स्पष्ट व लिखित धोरण जाहीर करणे.
  2. अभ्यास गट – या विषयाचा सखोल अभ्यास करण्यासाठी एक विशेष समिती / अभ्यास गट स्थापन करणे.
  3. सोशल मीडिया मॉनिटरिंग समाजमाध्यमांवरील चुकीची माहिती व फेक अकाउंट ओळखण्यासाठी व त्यावर तात्काळ कारवाई करण्यासाठी सायबर क्षेत्रातील नामांकित एजन्सीची नेमणूक करणे.

  1. कायदेशीर सहाय्य – सायबर कायद्यात तज्ज्ञ असणाऱ्या नामांकित वकिलांचा पॅनल तयार करणे,
  2. पोलिस कारवाई पॅनल – पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यासाठी व पाठपुरावा करण्यासाठी संस्थानचे अधिकारी यांचा विशेष पॅनल निश्चित करणे.

वरील उपाययोजना राबवल्यास, श्री साईबाबा संस्थानची प्रतिष्ठा अबाधित राहील, भक्तांचा विश्वास दृढ होईल व अशा प्रकारच्या फसवणुकीवर प्रभावी नियंत्रण मिळविता येईल

आपण या प्रस्तावाचा गांभीर्याने विचार करावा असे अश्याचे पत्र ग्रामसतांतर्फे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते यांनी श्री साईबाबा संस्थांनाला दिला आहे

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button