शिर्डी : राहाता शहरातील १५ चारी परिसरात निघालेल्या गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान तेथे बंदोबस्तासाठी उपस्थित असलेल्या पोलिसांना शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याप्रकरणी राहुल मुकुंदराव सदाफळ, व सागर ज्ञानेश्वर सदाफळ यांचे वर सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून सागर सदाफळ ला गजाआड केले असून राहूल सदाफळ फरार आहे .
दि . ७ सप्टेंबर रोजी राहाता पोलीस ठाण्याचे पोलीस राहाता गणेशनगर रस्त्यावरील १५ चारी भागातील गणपती मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणूक साठी बंदोबस्तासाठी कर्तव्यावर असताना
रात्री १० वाजता साउंड सिस्टीम बंद केल्याचे कारणा वरुन राग येवुन त्यांनी पोलीसांना शिवीगाळ करुन अंगावर धावुन येवुन धक्काबुक्की करुन तुझा पीआय, डीवायएसपी कोण आहे त्यांना साउंड बंद करायला बोलावुन घे असे म्हणत धमकी देवुन सरकारी कामात अडथळा केला .
या दरम्यान डीवायएसपी अमोल भारती यांनी ताबडतोब घटनास्थळी पोहोचून घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून परिस्थिती अटोक्यात आणली आहे . पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण, पोसई लेंडे हे करीत आहेत.
डिवायएसपी बोलव म्हणताच भारती हजर आरोपींनी पोलिसांना धक्काबुक्की केल्यानंतर कायदा हातात घेतल्यानंतर आमचा डीजे बंद होणार नाही तुझ्या डिवायएसपी बोलाव असे पोलिसांना दरडवताच शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांनी घटनास्थळी जात मीच डी वाय एस पी अमोल भारती असल्याचे आरोपींना दाखवून दिले .
दरम्यान भारती भल्या रात्री तेथे पोचल्याने त्यांची कर्तव्यदक्षता अधोरेखित होत आहे .
दादांचे कार्यकर्ते जेल मध्ये
कायदा मोडल तो माझा नाही, जो कोणी कायदा मोडेल त्याला पोलीस शिक्षा करतील त्यांनी मला फोन करू नये . मी गुंडगिरी ला मोडीत काढणार आहे या वाक्याचा प्रत्यय या प्रकरणातून पुढे आला असून कायदा हातात घेतल्याने खुदद सुजय दादांच्या कार्यकर्त्यांला जेल मध्ये बसण्याची वेळ आली आहे .