Letest News
दुसरे लग्न केल्याचा जाब विचारताच पतीकडून पहिल्या पत्नीला मारहाण! गुन्हा दाखल! बलात्कार करून, मुलाने ठोकली धूम! मात्र शिर्डी झाली हकनाक बदनाम साईभक्त महिलांप्रमाणेच आता स्थानिक महिलांच्याही गळ्यातील सोन्याच्या दागिन्यांची धूम स्टाईल होवू लागल... शिर्डीच्या साई संस्थानमधील लाखो रुपयांच्या अपहाराच्या प्रकरणात याचिकाकर्त्या कुठलीही सक्तीची कारवाई ... शिर्डीत अपहरण करून एकाचा खून! या संदर्भात सात अल्पवयीन मुलांना पोलिसांनी घेतले ताब्यात! भरत मोरे यांच्या त्या" वादग्रस्त वक्तव्याचा वकील संघाकडून निषेध ! कोल्हार घोटी महामार्गावर कोकणगाव जवळ ट्रक व ट्रॅव्हल बसचा भीषण अपघात! तीन ठार! सहा जण गंभीर जखमी! शिव,शाहु.फुले,आंबेडकर प्रबोधिनी समिती कडून शौकतभाई शेख सह सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान! तर मग साई संस्थान हाजी अब्दुल बाबा समाधी येथील देणगी व देखरेख स्वतःकडे का घेत नाही?--आ. संग्राम जगता... शिर्डीत व्हाइटनरची नशा करणाऱ्या तरुणांची वाढली संख्या! छत्रपती कॉम्प्लेक्स बनला त्यांचा अड्डा! आधार ...
क्राईमशिर्डी

शिर्डीच्या काकडी विमानतळा जवळ दोन जणांच्या खून प्रकरणी दोन संशयित इसमांना पोलिसांनी घेतले ताब्यात!

शिर्डी( प्रतिनिधी )

sai nirman
जाहिरात

शिर्डीच्या काकडी विमानतळा जवळ दोन जण ठार झाले होते . हा खून की दरोडा या संदर्भात चर्चा सुरू आहे. मात्र त्यामुळे शिर्डी व परिसरात मोठी खळबळ उडाली होती.

DN SPORTS

kamlakar

पोलिसांनी तपासाचे चक्रे वेगाने फिरवून दोन संशयित इसमांना शिंदे पळशे टोलनाका तालुका सिन्नर येथून ताब्यात घेतले. पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील तेलीम्बरपाडा येथील संदीप रामदास दहाबाड.व जगन काशिनाथ किरकिरे या दोन संशयित आरोपांना एका टेम्पोमध्ये पाठीमागील बाजूस बसलेले असताना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, दिनांक ०४/०४/२०२५ रोजी रात्री साहेबराव पोपट भोसले, रा. दिघे वस्ती, पिंप्री रोड, काकडी ता. राहाता यांचे राहते घरी अज्ञात आरोपीतांनी जबरी चोरी करण्याच्या उद्देशाने कोणत्या तरी प्राणघातक हत्यारांनी

१) कृष्णा साहेबराव भोसले, वय ३० २) साहेबराव पोपट भोसले, वय ६० यांना जीवे ठार मारून तसेच साकरबाई साहेबराव भोसले, वय ५५ सर्व रा. दिघे वस्ती, पिंप्री रोड, काकडी ता. राहाता यांना गंभीर जखमी करून मोटार सायकल व मोबाईल चोरून नेला. याबाबत पोलीस स्टेशन गुरनं १७१/२०२५ बीएनएस २०२३ कलम १०३ (१), १०९(१), ३११, ३३१ (८) प्रमाणे गुन्1/2 दाखल आहे.


काकडी, ता. राहाता येथे घडलेल्या गंभीर स्वरूपाच्या गुन्हयांची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ पोलीस अधिक्षक अहिल्यानगर, वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपुर, शिरीष वमने, उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी विभाग शिर्डी, यांनी तात्काळ घटनाटिकाणी भेट देऊन, गुन्हा उघडकीस आणणेबाबत स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना गुन्हा उघडकीस आणणेबाबत सुचना देऊन समांतर तपास करणेबाबत आदेशीत केले.

नमुद आदेशा प्रमाणे पोनि/श्स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि / हेमंत थोरात, पोसई/तुषार धाकराव, अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे, बापुसाहेब फोलाणे, ज्ञानेश्वर शिंदे, गणेश भिंगारदे, फुरकान शेख, गणेश लोंढे, संदीप दरंदले, अमृत आढाव, प्रमोद जाधव, जालीदर माने, बाळासाहेब खेडकर, रमीजराजा आत्तार, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, प्रशांत राठोड,

भगवान थोरात, सुनील मालणकर, बाळासाहेब गुंजाळ, अरूण मोरे, उमाकांत गावडे व चंद्रकांत कुसळकर अशांचे तीन पथक तयार करून, पथकास गुन्ह्यातील आरोपींची माहिती व शोध घेणेबाबत सुचना व मार्गदर्शन केले.


दि.०५/०४/२०२५ रोजी तपास पथके तांत्रीक विश्लेषण व बातमीदाराच्या आधारे गुन्हयाचा तपास करत असताना सदरचा गुन्हा करणारे दोन संशयीत इसम हे टेम्पोमधुन सिन्नर मार्गे नाशिककडे जात असलेबाबत खात्रीशीर माहिती मिळाली. पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या माहितीवरून पळशी टोलनाका, सिन्नर, जि. नाशिक येथे सापळा रचुन संशयीत इसमांचा शोध घेऊन एका टेम्पोमध्ये पाठीमागील बाजुस बसलेले संशयीत दोन इसम मिळून आल्याने

१) संदीप रामदास दहाबाड, वय १८.२) जगन काशिनाथ किरकिरे, वय २५ दोन्ही रा. तेलीम्बरपाडा, ता. मोखाडा, जि. पालघर अशांना ताब्यात घेतले.


ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीतांना विश्वासात घेऊन गुन्हयाचे अनुषंगाने विचारपूस केली असता संदीप रामदास दहावाड याने त्याचे साथीदारासह रात्री १२.३० वा. सुमारास काकडी विमानतळ परिसरामधील एका घरामध्ये जाऊन दोन तीन जणांना लाकडी दांडक्याने व फावडयाने मारहाण केली व चोरी केल्यानंतर पळून जात असलेबाबत माहिती सांगीतली. ताब्यात घेण्यात आरोपी नामे

१) संदीप रामदास दहाबाड, वय १८,२) जगन काशिनाथ किरकिरे, वय २५ दोन्ही रा. तेलीम्बरपाडा, ता. मोखाडा, जि. पालघर यांना गुन्ह्याचे तपासकामी राहाता पोलीस स्टेशनला हजर करण्यात आले असुन पुढील तपास राहाता पोलीस ठाणे हे करीत आहे.
तपास पथकास संशयीत आरोपीतांचा शोध घेणेकामी सिन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. संभाजी गायकवाड व सिन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार यांनी योग्य ती मदत केली आहे.


सदरची कारवाई वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपूर,शिरीष वमने, उपविभागीय पोलीस अधिकारी, शिडर्डी उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button