
राहाता पोलीस स्टेशन यांनी देशात प्रतिबंधीत असलेले मांगुर जातीचे clarias gariepinus प्रकारातील मासेंनी भरलेला ट्रक नाकाबंदी दरम्यान पकडुन केला गुन्हा दाखल…

दिनांक 05/06/2025 रोजीचे 23/00 वा. ते दिनांक 06/06/2025 रोजीचे सकाळी 06/00 वाजेदरम्यान मा. पोलीस अधिक्षक सोमनाथ गार्गे सो. मा. अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबर्मे सो. श्रीरामपुर व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने सो. शिर्डी विभाग शिर्डी यांच्या मार्गदर्शनाखाली बकरी ईद अनुषंगाने अवैध गोवंश वाहतुक कारवाई अनुषंगाने राहाता पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण,
पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे, पोलीस उपनिरीक्षक किरण सांळुखे, सफौ प्रभाकर शिरसाठ, पोहेकाँ/1956 विशाल पंडोरे, पोकाँ/811 अनिल गवांदे, पोना/688 विनोद गंभीरे व चापोहेकाँ/807 शेषराव अनारसे असे चितळी चौक येथे नाकाबंदी करीत असतांना एक पांढरे रंगाचा अशोक लिलैंड कंपनीचा ट्रक क्रमांक RJ25 GA6958 असा अहिल्यानगर कडुन शिडों दिशेने संशयीतरित्या दिसुन आल्याने त्यास चितळी चौक येथे थांबवून खात्री केली असता
त्यात देशात प्रतिबंधीत असलेले मांगुर जातीतील clarias gariepinus प्रकरातील मार्सेनी भरलेला ट्रक मिळून आल्याने ट्रक चालक यांस त्याबाबत विचारता तो उडवाउडवीचे उत्तरे देवू लागल्याने सदर मार्सेबाबत खात्री करणेकरीता सहाय्यक मत्सव्यवसाय विकास अधिकारी सौ. प्रतिक्षा सुधाकर पाटेकर नेम. अहिल्यानगर यांना बोलावुन घेवुन त्यांचे मार्फतीने खात्री केली असता सदर ट्रक मध्ये सुमारे 460,000/- रुपये किंचे सुमारे 4600/- किलो वजनाचे शासनाने प्रतिबंध केलेले मांगुर जातीचे
clarias gariepinus प्रकरातील मासे मिळुन आल्याने पंचनामा करुन सदरचा पर्यावरणाला धोका निर्माण करुन तसेच लोकांनी खाल्यास मोठ्या स्वरुपात गंभीर आजार व दुखापत होण्याची जाणीव असतांना यातील आरोपी नामे 1) सादाब हकिम खान वय 25 वर्षे रा. पुनसवास वार्ड क्रमांक 14 नेताजी धरमपुरी ता. धरमपुरी जि. धार राज्य मध्यप्रदेश 2) मांगीलाल नाथुलाल कहार वय 35 वर्षे रा. राजगड ता. सरदारपुर जिल्हा धार राज्य मध्यप्रदेश
3) नरसिंहा मुंग्रा रा. भिगवण जिल्हा पुणे व 4) कमल चौहान रा राजगड जिल्हा धार राज्य मध्यप्रदेश यांच्याविरुध्द गुन्हा रजि. क्रमांक 246/2025 भारतीय न्याय संहिता कलम 223,275 सह अन्न सुरक्षा व मानके अधिनीयम 2006 चे कलम 58 व 59 व पर्यावरण (संरक्षण) अधिनीयम 1986 चे कलम 3,5,15 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तरी अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक मा. श्री सोमनाथ गार्गे सो., मा. अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबमें सो. श्रीरामपुर परिमंडळ व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने सो. शिर्डी विभाग शिर्डी यांच्या मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे राहाता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण,
पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे, पोलीस उपनिरीक्षक किरण सांळुखे, सफौ प्रभाकर शिरसाठ, पोहेकाँ/ 1956 विशाल पंडोरे, पोकाँ/811 अनिल गवांदे, पोना/688 विनोद गंभीरे व चापोहेकाँ /807 शेषराव अनारसे अशांनी सदरची कामगीरी केली आहे.