Letest News
शिर्डीच्या दोन दमदार व्यक्तिमत्त्वांचा गौरव-विठ्ठलराव पवार आणि दिलीप खरात सन्मानित शिर्डीत मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर-गरजू रुग्णांसाठी मोठा दिलासा अहिल्यानगर पोलीस मुख्यालयात स्मोक हँड ग्रेनेडचा स्फोट-चार प्रशिक्षणार्थी पोलीस जखमी समता पतसंस्थेच्या “मॅनेजरच्या सांगण्यावरूनच पैसे टाकले” भोंदू खरातची न्यायालयात धक्कादायक कबुली वंदे भारतने मुंबई ते शिर्डी-मुख्यमंत्री फडणवीसांचा साधेपणाचा संदेश राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री फडणवीस साईचरणी नतमस्तक-भक्ती ते शक्ती : शिर्डीत डिफेन्स प्रकल्पाचे भव्य ... “शिर्डीत पेट्रोलसाठी झुंबड! पंपांवर लांबच लांब रांगा=नागरिकांना संयम ठेवण्याचे आवाहन” स्मार्ट ग्राम’चा फक्त गाजावाजा; सावळीविहीरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ!”“CCTV बंद स्ट्रीट लाईट गुल-सावळी... “क्लबवर छापे… पण ‘मुख्य सूत्रधार’ अजूनही मोकाट?”“राहात्यात अवैध धंद्यांना कोणाचा राजकीय वरदहस्त?” “गर्भलिंग चाचणी रॅकेटचे धागेदोरे निफाडपर्यंत १८ आरोपी जेरबंद ६ डॉक्टर अटकेत!”
क्राईमखेळ

शिर्डीत भाविकांची लूट करणाऱ्यांवर पोलिसांचा मोठा दणका! बोगस आयुर्वेदिक दुकान सील

शिर्डी | प्रतिनिधी
साई दर्शनासाठी आलेल्या भाविकांना हिप्नोटाईज करून जडीबुटीच्या नावाखाली लुटणाऱ्या भामट्यांच्या टोळीचा अखेर पर्दाफाश झाला असून शिर्डी पोलिसांनी धडक कारवाई करत “साई कृपा आयुर्वेदिक” या दुकानाला सील ठोकले आहे. या कारवाईमुळे भाविकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


🚨 संमोहन करून ११ हजारांची लूट; आंध्रप्रदेशातील भाविक फसला
दि. १३ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे अडीच वाजता द्वारकामाई मंदिर समोर आंध्रप्रदेशातील अनंतपूर येथील भाविक थंगपूर गिरीकुमार थंगपूर सत्यनारायण यांना एका महिलेनं गाठलं.
“टक्कल जाईल, केस पुन्हा उगवतील” असे आमिष दाखवत त्यांना जवळच असलेल्या साई कृपा आयुर्वेदिक दुकानात नेण्यात आले.
बनावट जडीबुटीच्या नावाखाली तब्बल ११ हजार ४०० रुपये उकळण्यात आले. औषध दिल्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संबंधित भाविकाने ग्रामस्थांच्या मदतीने शिर्डी पोलीस ठाण्यात धाव घेतली.


⚖️ चार जणांवर गुन्हा दाखल; पोलिसांची तात्काळ कारवाई
या प्रकरणी मनोज शिरके, मोना शिरके, राणी पखाले आणि रज्जो सडमोके या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिर्डी पोलिसांनी तातडीने कारवाई करत पालखी रोडवरील साई कृपा आयुर्वेदिक दुकान सील केले. फिर्यादीचे ११ हजार ४०० रुपये परत मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे.


👮‍♂️ अ‍ॅक्शन मोडमध्ये पोलिस प्रशासन
पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल भारती व पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी स्वतः या कारवाईवर लक्ष ठेवत कठोर भूमिका घेतली.
वैद्यकीय अधिकारी, राहता ग्रामीण रुग्णालय यांना पत्र देऊन संबंधित दुकानाची व परिसरातील इतर संशयित औषधी दुकानांची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


🛑 भाविकांना आमिष दाखवून नवा फसवणुकीचा फंडा
शिर्डीत दररोज लाखो भाविक येत असल्याने काही अपप्रवृत्ती नवीन फंडे वापरून लूट करत असल्याचे दिसून येते.
केस येतील, लठ्ठपणा कमी होईल, काळे डाग जातील अशा खोट्या आश्वासनांनी भाविकांना विश्वासात घेऊन संमोहन केल्याचे चौकशीत उघड झाले आहे.


🙏 भाविकांनी सतर्क राहण्याचे आवाहन
पोलिसांनी भाविकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या आमिषाला बळी पडू नये. संशयास्पद प्रकार आढळल्यास त्वरित पोलीस ठाण्यात संपर्क साधावा.
शिर्डी पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे भाविकांच्या सुरक्षेला बळ मिळाले असून “साईनगरीत फसवणूक खपवून घेतली जाणार नाही” असा स्पष्ट संदेश प्रशासनाने दिला आहे

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button