अहिल्यानगर जिल्ह्यात अंमली पदार्थ कायद्यान्वये दाखल असलेल्या गुन्ह्यातील 933 किलो 570 ग्रॅम गांजा विशेष मोहिमेअंतर्गत नष्ट करण्यात आला. ही कारवाई अंमली पदार्थ नाश प्रक्रिया समितीच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

अंमली पदार्थ नाश प्रक्रिया समितीची कामगिरी
मा. श्री सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे नोडल अधिकारी पो.नि. श्री किरणकुमार कबाडी यांना जिल्ह्यातील जप्त अंमली पदार्थ नाश करण्याबाबत आदेश दिले.
सदर समितीमध्ये सहभागी झालेले अधिकारी:
मा. श्री सोमनाथ घार्गे – अध्यक्ष, अंमली पदार्थ नाश प्रक्रिया समिती
मा. श्री वैभव कलुबर्मे – सदस्य, अपर पोलीस अधीक्षक
मा. श्री जगदीश भांबळ – सदस्य, पोलीस उपअधीक्षक (गृह)
श्री किरणकुमार कबाडी – पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, नोडल अधिकारी अंमली पदार्थ टास्क फोर्स
सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित तपास अधिकारी व पोलीस पथकाने जप्त केलेल्या अंमली पदार्थाचा आढावा घेऊन, न्यायालयाची परवानगी घेऊन कार्यवाही केली.
नाश करण्याची विशेष मोहिम
अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड, तोफखाना, राहुरी, कर्जत, पारनेर, श्रीरामपुर शहर, शेवगांव, मिरजगांव, कोपरगांव तालुका, भिंगार कॅम्प, श्रीगोंदा आणि राहाता पोलीस स्टेशन याठिकाणी दाखल असलेल्या एकुण 20 गुन्ह्यातील गांजा व गांजाची झाडे नष्ट करण्यात आली.
संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून, महाराष्ट्र प्रदूषण महामंडळ मुंबई यांचे प्रमाणपत्र घेऊन महाराष्ट्र इन्व्हीरो पॉवर लि., रांजणगांव, एम.आय.डी.सी., ता. शिरुर, जि. पुणे येथे या अंमली पदार्थाचा नाश करण्यात आला.
कारवाईत सहभाग असलेले अधिकारी
सदर मोहिमेत सहभागी झालेले अधिकारी:
श्री किरणकुमार कबाडी, पोलीस निरीक्षक व नोडल अधिकारी अंमली पदार्थ टास्क फोर्स
पोलीस अंमलदार: शामसुंदर गुजर, पंकज व्यवहारे, संतोष खैरे, अतुल लोटके, चंद्रकांत कुसळकर, अर्जुन बडे, जालिंदर माने, जयराम जंगले
ही कारवाई श्री सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, मा. श्री वैभव कलुबर्मे, मा. श्री जगदीश भांबळ यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पाडण्यात आली.